opposition meeting live updates : देशात एनडीए विरुद्ध इंडियाचा सामना रंगणार, एनडीए विरोधातील इंडियाचा अर्थ नेमका काय?
Opposition Meeting Live Updates २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मोदी विरोधकांचा अजेंडा ठरला आहे. २०२४ च्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्धार करण्यात आलाय. देशाला पर्यायी, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अजेंडा देण्याचा निर्धार झालाय.
नवी दिल्ली : देशात एनडीए विरुद्ध इंडिया असा सामना आता रंगणार आहे. विरोधकांच्या एकजुटीला इंडिया असं नाव देण्यात आलंय. आय म्हणजे इंडियन, एन म्हणजे नॅशनल, डी म्हणजे डेमोक्रॅटिक, आय म्हणजे इनक्युझीव्ह, ए म्हणजे अलायन्स. अशाप्रकारे इंडिया हे विरोधकांच्या एकीचं नाव असणार आहे. राहुल गांधी यांनी इंडियाच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. याला सर्वांनी होकार दिला. मोदींचे सगळे विरोधक एकटवले. त्यांनी इंडिया हे विरोधकांच्या एकीला नाव दिलंय. ठाकरे गटाच्या खासदार प्रीयंका चतुर्वेदी यांनी हे ट्वीट केलंय. २०२४ मध्ये टीम इंडिया विरुद्ध टीम एनडीए चक दे इंडिया.
मोदी विरोधकांचा संकल्प
२०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मोदी विरोधकांचा अजेंडा ठरला आहे. २०२४ च्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्धार करण्यात आलाय. देशाला पर्यायी, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अजेंडा देण्याचा निर्धार झालाय. भाजपकडून विरोधकांविरोधात सुरू असलेल्या षडयंत्रांविरोधात लढणार असल्यांच सांगण्यात आलंय. संविधानात नमूद केलेल्या भारताच्या कल्पनेचे रक्षण करण्याचा संकल्प करण्यात आलाय.
इंडिया नावाला दिली पसंती
अल्पसंख्याकांविरुद्ध निर्माण होत असलेल्या द्वेष आणि हिंसाचाराचा पराभव करण्याचा संकल्प करण्यात आलाय. मणीपूरला पुन्हा शांतता आणि सलोख्याच्या मार्गावर आणणार असल्याचा निर्धारही विरोधकांच्या बैठकीत करण्यात आला. महागाई आणि बेरोजगारी विरोधात लढण्याचा संकल्प विरोधकांनी केलाय. विरोधकांच्या गटाचं इंडिया हे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. सर्व मोदी विरोधकांनी इंडिया या नावाला पसंती दिल्याचं कळतं.
एनडीएमध्ये ३८ पक्षांचा सहभाग
भाजप, शिवसेना, अजित पवार गट, आरपीआय, प्रहार जनशक्ती पार्टी, जनसुराज शक्ती पार्टी, एआयएडीएमके, एनपीपी (मेघालय), एनडीपीपी, एसकेएम, जेजेपी, आयएमकेएमके, एजेएसयू, एमएनएफ, टीएमसी, आयटीएफटी, बीपीपी, पीएमके, एमजीपी, अपना दल, एजीपी, राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी, निषाद पार्टी, युपीपीएल, एआयआरएनसी, शिरोमणी अकाली दल संयुक्त, जनसेना, लोक जनशक्ती पार्टी, हिंदुस्थानी आवाम मोर्चा, आरएलएसपी, एसबीएसपी, बीजेजेएस, केरळ काँग्रेस, गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंट, जनथीपथ्य राष्ट्रीय सभा, नागा पिपल्स फ्रंट, युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी, हिल स्टेट डेमोक्रॅटिक पार्टी अशा ३८ पक्षांनी एनडीएच्या बैठकीत सहभाग राहणार आहे.