आम्हालाही 272 चा आकडा गाठण्याची संधी द्यावी, विरोधक राष्ट्रपतींना विनंती करणार

नवी दिल्ली : एक्झिट पोलमध्ये एनडीएला 300 च्या पुढे जागा दाखवण्यात आल्या आहेत. पण लोकसभेच्या निकालानंतर त्रिशंकू परिस्थिती झाल्यास विरोधकांनी सत्तास्थापनेची तयारी केली आहे. येत्या दोन दिवसात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना याबाबतचं पत्र देण्याचंही नियोजन विरोधी पक्षांनी केलंय. निकालानंतर आम्हालाही 272 हा बहुमताचा आकडा सिद्ध करण्याची संधी द्यावी, अशी विनंती विरोधी पक्षांकडून केली जाणार आहे. […]

आम्हालाही 272 चा आकडा गाठण्याची संधी द्यावी, विरोधक राष्ट्रपतींना विनंती करणार
Follow us
| Updated on: May 22, 2019 | 9:12 PM

नवी दिल्ली : एक्झिट पोलमध्ये एनडीएला 300 च्या पुढे जागा दाखवण्यात आल्या आहेत. पण लोकसभेच्या निकालानंतर त्रिशंकू परिस्थिती झाल्यास विरोधकांनी सत्तास्थापनेची तयारी केली आहे. येत्या दोन दिवसात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना याबाबतचं पत्र देण्याचंही नियोजन विरोधी पक्षांनी केलंय. निकालानंतर आम्हालाही 272 हा बहुमताचा आकडा सिद्ध करण्याची संधी द्यावी, अशी विनंती विरोधी पक्षांकडून केली जाणार आहे.

विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून राष्ट्रपतींना पत्र लिहिलं जाईल. निवडणूक निकालानंतर 17 व्या लोकसभेची अधिसूचना निघाल्यानंतर आम्हालाही 272 चे संख्याबळ सिद्ध करण्याची संधी मिळावी अशी मागणी विरोधकांकडून केली जाईल. या पत्रासोबत देशात आतापर्यंत त्रिशंकू परिस्थितीत सरकार स्थापनेसाठी कशी प्रक्रिया झाली त्याची यादीही रेफरन्ससाठी देण्यात येणार आहे.

या पत्रावर टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी, सपा प्रमुख अखिलेश यादव, बसपा प्रमुख मायावतींचे प्रतिनिधी सतीश मिश्रा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल, डीएमके या पक्षांच्या स्वाक्षऱ्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होऊ द्यायचं नाही असं म्हणत हे विरोधक एकत्र आले आहेत.

चंद्राबाबू गेल्या काही दिवसांपासून राजधानीतील राजकारणात सक्रिय झाले आहेत. एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे, पण तिसऱ्या आघाडीसाठीही प्रयत्न सुरु आहेत. चंद्राबाबूंनी काँग्रेस नेतृत्त्वाचीही भेट घेतली. त्यानंतर शरद पवार आणि जेडीएसचे नेते एचडी देवेगौडा यांचीही भेट घेतली.

VIDEO :

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.