माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कोरोनामुक्त; एम्स रुग्णालयातून घरी परतले

डॉ. मनमोहन सिंग यांची 19 एप्रिल रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांनी एम्स रुग्णाालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये कोरोनावर उपचार घेतले. (Former Prime Minister Manmohan Singh discharged; Returned home from the hospital)

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कोरोनामुक्त; एम्स रुग्णालयातून घरी परतले
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कोरोनामुक्त
Follow us
| Updated on: Apr 29, 2021 | 6:06 PM

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग हे कोरोनामुक्त झाले आहेत. गुरुवारी सकाळी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आले. वयाच्या 88 वर्षांतही त्यांनी कोरोना संसर्गावरील उपचाराला योग्य प्रतिसाद दिला आणि ठणठणीत बरे होऊन ते घरी परतले. विविध व्याधींचा त्रास असतानाही त्यांनी विषाणूचा मुकाबला करीत देशवासियांचे मनोबल वाढवणारे उत्तम उदाहरण उभे केले आहे. (Former Prime Minister Manmohan Singh discharged; Returned home from the hospital)

डॉ. मनमोहन सिंग यांची 19 एप्रिल रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांनी एम्स रुग्णाालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये कोरोनावर उपचार घेतले. दहा दिवसांपूर्वी त्यांना हलकासा ताप आला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही म्हणून खबरदारीच्या हेतूने कुटुंबियांनी त्यांची कोरोना चाचणी केली होती. गेल्या वर्षीही मे महिन्यात देशात कोरोना महामारीचे टेन्शन वाढले असतानाच त्यांना एम्स रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. त्यावेळी त्यांना औषधांचे रिअ‍ॅक्शन झाले होते. तसेच तापही आला होता. त्यामुळे त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. त्यावेळीही त्यांनी धैर्याने आजारपणावर मात केली होती.

अलिकडेच घेतले होते व्हॅक्सिन

अलिकडेच त्यांनी ‘कोवॅक्सिन’ या कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांनी 4 मार्चला पहिला आणि 3 एप्रिलला दुसरा डोस घेतला होता. त्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना मधुमेहाचाही त्रास आहे. तसेच याआधी दोनवेळा बायपास सर्जरी झाली आहे. पहिली सर्जरी 1990 मध्ये युनायटेड किंग्डममध्ये झाली होती. तसेच 2004 मध्ये एस्कॉर्ट रुग्णालयात त्यांच्यावर अ‍ॅण्जीओप्लास्टी करण्यात आली होती, तर 2009 मध्ये एम्स रुग्णालयात त्यांच्यावर दुसरी बायपास सर्जरी (कोरोनरी) करण्यात आली.

पंतप्रधान मोदींना पत्र पाठवून सुचवले होते उपाय

डॉ. मनमोहन सिंग यांनी एम्स रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी देशातील कोरोनाच्या वाढत्या फैलावाबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पाच महत्त्वाचे उपाय सुचवले होते. ते सध्या राजस्थानमधून राज्यसभेवर गेले आहेत. 2004 ते 2014 या कालावधीत ते भारताचे पंतप्रधान म्हणून कार्यरत राहिले आहेत. (Former Prime Minister Manmohan Singh discharged; Returned home from the hospital)

इतर बातम्या

ICSI CSEET Admit Card 2021 : आयसीएसआय सीएसईईटी परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून करा डाउनलोड

Randhir Kapoor | अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण, मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.