काँग्रेसला या राज्यातही मोठे खिंडार; भाजपात प्रवेश केल्याने फक्त 3 आमदार राहणार शिल्लक
काँग्रेसचे आमदार मायकल लोबो, दिगंबर कामत, दिलायला लोबो, भाजपमध्ये जाणार आहेत. त्यामुळे भाजपचे गोव्यात ऑपरेशन लोटस यशस्वी झाल्याचे सांगितले जात आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एकीकडे भारत जोडो यात्रा सुरु असताना गोव्यात मात्र काँग्रेस पक्षाला खिंडार पडले आहे. गोव्यातील दोन तृतीयांश पेक्षा जास्त काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला आहे.मागील वर्षीही गोव्यामध्ये काँग्रेसच्या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला हता, त्यावेळी काँग्रेसला मोठे खिंडार पडले होते. गोवा विधानसभेतील 11 पैकी 8 आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामध्ये मायकल लोबो, दिगंबर कामत, दिलायला लोबो, भाजपमध्ये जाणार आहेत. त्यामुळे भाजपचे गोव्यात ऑपरेशन लोटस यशस्वी झाल्याचे सांगितले जात आहे.