मोठी बातमी: चीनचं ‘ते’ अनियंत्रित रॉकेट अखेर समुद्रात कोसळलं
हे रॉकेट समुद्रात कोसळणार की मानवी वस्तीत, हा प्रश्नही अनेकांना पडला होता. | Chinese rocket
नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय असलेले चीनचे अनियंत्रित रॉकेट (Chinese rocket)अखेर पृथ्वीवर कोसळले आहे. काहीवेळापूर्वीच या रॉकेटचे अवशेष अरबी महासागरात कोसळल्याचे वृत्त ‘एएफपी’ न्यूजने दिले आहे. (Out of control Chinese rocket segment disintegrates over Arabian Sea)
Remnants of China’s biggest rocket landed in the Indian Ocean, with the bulk of its components destroyed upon re-entry into the Earth’s atmosphere: Reuters
— ANI (@ANI) May 9, 2021
29 एप्रिल रोजी चीनकडून हे रॉकेट अंतराळात सोडण्यात आले होते. हे रॉकेट अंतराळात स्पेस स्टेशन बांधण्यासाठी साहित्य घेऊन जात होते. मात्र, तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या रॉकेटने पृथ्वीच्या दिशेने उलटा आणि अनियंत्रित प्रवास सुरु केला होता. हे रॉकेट पृथ्वीवर कोसळल्यास मोठे नुकसान होईल, अशी शक्यता चिनी माध्यमांनी वर्तविली होती. मात्र, पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर हे रॉकेट नष्ट करण्यात आले. त्यानंतर रॉकेटचे तुकडे समुद्रात जाऊन कोसळले, अशी माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे.
#BREAKING Chinese rocket segment disintegrates over Arabian Sea: state TV pic.twitter.com/iXq7VJcQu4
— AFP News Agency (@AFP) May 9, 2021
…म्हणून अमेरिकेने ‘ते’ रॉकेट अंतराळात उद्ध्वस्त केले नाही
अमेरिकेच्या लष्कराने आता नियंत्रणबाह्य चिनी रॉकेट उडवण्याची (शूट डाऊन) योजना नसल्याचे स्पष्ट केले होते. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी गुरुवारी माहिती दिली. हे रॉकेट समुद्र किंवा तत्सम मोकळ्या जागेवर कोसळून कोणालाही हानी पोहोचणार नाही, असा अंदाज ऑस्टिन यांनी व्यक्त केला होता.
रॉकेटचे वजन तब्बल 21 टन
अंतराळात रॉकेटचा मुख्य भाग फिरत होता. हाच भाग पृथ्वीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. रॉकेटचा हा भाग जवळपास 100 फूट लांब होते. याचे वजन तब्बल 21 टन होते. मात्र, पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करताना या रॉकेटचे तुकडे झाल्याची शक्यता आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या रॉकेटचे काही अवशेष अरबी समुद्रात कोसळले आहेत.
रॉकेटचा वेग 7 किमी प्रतिसेकंद
पृथ्वीवर पडणाऱ्या या रॉकेटचे नाव लॉन्ग मार्च 5-बी वाय-2 (Long March 5B Y2 Rocket) असे होते. सध्या हे रॉकेट पृथ्वीच्या बाजूने लो-अर्थ ऑरबिटमध्ये फिरत होते. म्हणजेच हे रॉकेट सध्या पृथ्वीपासून 170 ते 372 किलोमीटर उंचीवर आहे. हे रॉकेट पृथ्वीभोवती तब्बल 25,490 किलोमीटर प्रतितास म्हणजेच एका सेकंदाला 7.20 किलोमीटर एवढ्या गतीने फिरत होते.
संबंधित बातम्या :
चीनचं रॉकेटवरील नियंत्रण सुटलं, ‘या’ देशांवर कधीही कोसळण्याची शक्यता, पृथ्वी संकटात ?
Chinese rocket: कोणत्याही क्षणी चीनचं ‘ते’ अनियंत्रित रॉकेट पृथ्वीवर कोसळणार
(Out of control Chinese rocket segment disintegrates over Arabian Sea)