नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या (Pakistan) कुरापती वाढल्या असल्या तरी पाककडून कोणत्याच गोष्टीत माघार घ्यायची चिन्हं दिसत नाहीत. तसेच गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा वाढला असल्याचे चित्र समोर आले आहे. सोमवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (External Affairs Minister S Jaishankar) यांनी गुजरातमध्ये वक्तव्य करतना म्हटले होते की, पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय दहशतवादात तज्ज्ञ आहे. त्याबरोबरच दहशतवादाला (Terrorism) उघडपणे पाठिंबा देणारा पाकिस्तानसारखा दुसरा देश नाही अशी जोरदार टीकाही त्यांनी केली होती. त्यामुळे जयशंकर यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तान चक्रावले आहे.
त्यामुळे पाकिस्तानकडून भारताबद्दल आता खोट्या अफवा आणि दावे केले जात आहेत. आणि जगाची दिशाभूल करण्याचे कामही केले जात आहे.
पाकिस्तानमधील परराष्ट्र मंत्रालयाकडून एक निवेदन काढण्यात आले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, जयशंकर यांचे वक्तव्य हे सांगण्यासाठी पुरेसे आहे.
प्रत्येक वेळी भारतातील नेते दहशतवादाबद्दल आणि पाकिस्तानविरोधात जगाची दिशाभूल करण्याचे काम करतात. असं म्हणत त्यांनी निषेधही व्यक्त केला आहे.
पाकिस्तानने तर असा दावा केला आहे की भारत आपल्या भूमीतून दहशतवादाला पाठिंबा देत असल्याचे त्यामध्ये म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी पाकिस्तानचा खरपूस समाचार घेत पाकवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. एकीकडे जग भारताला आयटीमध्ये तज्ज्ञ मानते, तर दुसरीकडे पाकिस्तान मात्र आंतरराष्ट्रीय दहशतवादात निष्णात झाले आहे.
पाकिस्तानकडून ज्या प्रकारे दहशतवादाला पाठिंबा दिला जातो त्या प्रकारे इतर कोणताही देश दहशतवादाला पाठिंबा देत नाही.
भारताविरोधात नेहमीच पाकिस्तानकडून कोणते ना कोणते षडयंत्र रचले जाते. 26/11 च्या हल्ल्यानंतर असे वर्तन पाकिस्तानकडून अपेक्षित नव्हते.
तरीही पाकिस्तानकडून वारंवार दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
मंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानवर टीका करताना म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांकडून अनेक वेळा निरपराध लोकांचे जीव घेतले गेले आहेत.
मग तो उरी हल्ला असो किंवा पुलवामातील दहशतवादी हल्ला असो. पाककडून हे हल्ले होत असले तरी भारतानेही त्याला नेहमीच चोख प्रत्युत्तर दिले आहे.
एकीकडे उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला, तर दुसरीकडे पुलवामा हल्ल्यानंतर एअर स्ट्राइक करण्यात आला असल्याचे जयशंकर यांनी सांगितले.