प्रेम केलं म्हणून शिक्षा काय तर, पंच म्हणाले रस्त्यावरची थुंकी चाट…

| Updated on: Oct 26, 2022 | 7:44 PM

मुलगा- मुलगी प्रेमात पडल्यानंतर दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला मात्र त्यांचा धर्म आडवा आला म्हणून लोकांनी प्रियकराला रस्त्यावरची थुंकीच चाटायला लावली.

प्रेम केलं म्हणून शिक्षा काय तर, पंच म्हणाले रस्त्यावरची थुंकी चाट...
Follow us on

नवी दिल्लीः बिहारच्या समस्तीपूरमध्ये (Bihar Samastipur) एका पंचायतीने प्रेम करणाऱ्या एका जोडप्याला भयंकर शिक्षा दिली आहे. समस्तीपूरच्या विभूतीपूरमध्ये एका मुलाने दुसऱ्या धर्माच्या मुलीवर प्रेम (Love) केले. त्यावरुन त्या मुलाला गावातील पंचायतीने प्रियकराला मारहाण (Beating) करून माफी मागण्यास सांगितली. त्यानंतर त्याला थुंकी चाटण्याची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.

विभूतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात दोन वर्षांपूर्वी वेगवेगळ्या धर्मातील मुलगा आणि मुलगी प्रेमात पडली होती. त्यामुळे दोघांना भेटण्याची ओढ कायम राहिली होती. त्यामुळे त्यांना एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले.

कुटुंबीयांचा आणि गावातील लोकांचा विरोध होणार असल्याने या दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रेयसीने तरुणाला फोन करुन त्याला घरातून बाहेर येण्यास सांगितले.

मात्र दोघंही ज्या ठिकाणी भेटणार होते, त्या ठिकाणी भेटण्याआधीच मुलीच्या कुटुंबीयांनी या दोघांनाही पकडले आणि मुलाला बेदम मारहाणही केली.

त्यानंतर लोकांनी प्रियकर आणि प्रेयसी दोघंही वेगवेगळ्या धर्माची असल्याने गावात प्रचंड तणाव निर्माण झाला. दोन्ही गटात वादही उफाळून आले.

त्यामुळे गावात ताण तणाव पसरल्यानंतर काही जाणकारांनी दोन्ही बाजूंची पंचांची बैठक बोलवून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

यावेळी गावातील ज्येष्ठ पंचांनी मुलीच्या प्रियकराकडून माफीनामा लिहून घेण्यास सांगितले. त्या प्रियकराने तो लिहूनही दिला.

मात्र त्यानंतर त्याला शिक्षा म्हणून त्याला थुंकी चाटण्याची शिक्षाही सुनावण्यात आली. प्रियकराला जबरदस्तीने जमिनीवर थुंकून चाटण्यास सांगितले. मुलाने ही शिक्षा मान्य करुन या प्रकरणावर पडदा टाकण्यात आले.

गावातील पंचांनी मात्र युवकाला शिक्षा सुनावल्यानंतर आणि त्या युवकानेही दिलेली शिक्षा मान्य केल्यानंतर मात्र हे प्रकरण पोलीस स्थानकात गेले. त्यामुळे आता त्या पंचाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मात्र जिल्हा पोलीस प्रमुखांनी त्या गावात धाव घेऊन या प्रकरणी माहिती घेतली आहे. त्यामुळे आता पुढील कारवाई काय होणार आहे त्याकडेच साऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे.