Pankaja Munde | राष्ट्रीय मोहिमेवर पंकजा मुंडे? मध्यप्रदेशात काय करतायत ते वाचा, बघा सविस्तर
पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना भाजपच्या मध्य प्रदेश सहप्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
भोपाळ : भाजपच्या राष्ट्रीय महामंत्री आणि माजी महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना भाजपच्या मध्य प्रदेश सहप्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यानंतर पंकजा मुंडे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे भोपाळ दौऱ्यावर आहेत. (Pankaja Munde in Madhya Pradesh attending BJP meeting)
भोपाळमध्ये आगमन होताच पंकजा मुंडे यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेतली. त्यानंतर सिल्होरमध्ये मध्य प्रदेश भाजप कोअर ग्रुपच्या बैठकीला पंकजांनी हजेरी लावली. भोपाळमध्ये रविवारी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या निवासस्थानी मध्य प्रदेशच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीलाही पंकजा मुंडे उपस्थित होत्या.
जिल्हाध्यक्षांसोबत प्रशिक्षण वर्ग
पंकजा मुंडे यांनी काल भाजप जिल्हाध्यक्षांच्या प्रशिक्षण वर्गात राष्ट्रीय महामंत्री कैलाश विजयवर्गीय, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, भाजप प्रदेशाध्यक्ष वी. डी. शर्मा, सह प्रभारी विश्वेश्वर टुडू, संगठन महामंत्री सुहास भगत, सह-संगठन महामंत्री हितानंद शर्मा यांच्यासह उपस्थिती लावली.
भोपाल मे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानजी के निवास पर मध्यप्रदेश के विधायक दल की बैठक संपन्न हुई | इस बैठक मे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानजी, प्रभारी मुरलीधरजी राव, सह प्रभारी विश्वेश्वर टूडूजी, प्रदेश अध्यक्ष विष्णू दत्त शर्माजी, सुहास भगतजी मंच पर विराजमान थे..@ChouhanShivraj pic.twitter.com/3wgX91XcIc
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) December 27, 2020
साताऱ्याच्या सुपुत्राशी स्नेहभेट
दरम्यान, भोपाळमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून कार्यरत असलेले महाराष्ट्रातील साताऱ्याचे भूमिपुत्र आएएस अधिकारी डॉ. सुदाम खाडे (आयुक्त, जनसंपर्क) यांच्या निवासस्थानी भेट दिल्याची माहिती पंकजा मुंडेंनी दिली. मध्यप्रदेशची सह प्रभारी झाल्यानंतर पहिल्यांदाच भोपाळला आल्याची माहिती मिळाल्यानंतर डॉ. सुदाम खाडे यांनी आग्रहपूर्वक आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. कौटुंबिक स्वागत झाल्यानंतर मनमोकळ्या गप्पांमध्ये डॉ. खाडे यांनी लोकनेते मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला, असंही पंकजा मुंडेंनी सांगितलं.
राजमाता आणि गोपीनाथ मुंडेंच्या नातेसंबंधांना उजाळा
खासदार यशोधरा राजे शिंदे यांनीही पंकजा मुंडेंसोबत भेटीचा आनंद व्यक्त केला. गोपीनाथ मुंडे आणि राजमाता यांच्या स्नेहपूर्ण नात्याला यशोधरा राजे शिंदेंनी उजाळा दिला. त्यावर पंकजा मुंडेंनीही संघटन मजबुतीसाठी वारंवार भेटीगाठी होण्याचा विश्वास व्यक्त केला.
मुझे भी खुशी हुई आपसे मिलकर… राजमाता से स्नेह और आदर का रिश्ता रहा है.. आपसे संघटन मजबूत करने के लिए भविष्य में मिलना होता रहेगाI https://t.co/Kt63FQiOhG
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) December 28, 2020
संबंधित बातम्या :
जेपी नड्डांची भाजपच्या निवडणूक प्रभारींसोबत बैठक; पंकजा, तावडे, शेलार उपस्थित राहणार
(Pankaja Munde in Madhya Pradesh attending BJP meeting)