Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : काही झालं तर मी ऊस तोडायला जाईन, पंकजा मुंडे यांचं सूचक विधान; कुणाला दिला इशारा?

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी रासपच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून धक्कादायक विधाने केली आहेत. राष्ट्रीय समाज पार्टी हे माझं माहेर आहे. कारण हा माझ्या भावाचा पक्ष आहे. माझ्या भावाच्या पक्षावर माझं सतत लक्ष असतं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Video : काही झालं तर मी ऊस तोडायला जाईन, पंकजा मुंडे यांचं सूचक विधान; कुणाला दिला इशारा?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 7:04 AM

नवी दिल्ली : मला भीती वाटत नाही. कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईल. महादेव जानकर जातील मेंढ्या वळायला. अजून काय आहे, असं सूचक विधान करतानाच आम्हाला काही गमवायचंच नाही. आम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची आस्था, अपेक्षा आणि लालसा नाही, असं मोठं विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं. पंकजा मुंडे यांचं हे विधान म्हणजे एक प्रकारे भाजपला इशाराच असल्याचं सांगितलं जात आहे.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने दिल्लीत आज राष्ट्रीय समाज पक्षाकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी हे सूचक विधान केलं. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तुम्ही म्हणताय ताईची पार्टी ताईची पार्टी. माझी कुठली पार्टी? मी भाजपची आहे. भाजप माझी थोडीच आहे. भाजप खूप मोठा पक्ष आहे. मी भाजपची होऊ शकते. पक्ष माझा होऊ शकत नाही. कारण तो मोठा पक्ष आहे, असं धक्कादायक विधानही पंकजा मुंडे यांनी केलं.

हे सुद्धा वाचा

रासप माझं माहेर

एक नव्हे हजार महादेव जानकर तयार व्हावेत हे गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्वप्न होतं. मी त्यांच्याशी सतत वाद घालत असते. माझं अर्ध लक्ष राष्ट्रीय समाज पार्टीवर आहे. तुम्ही हे का नाही म्हटलं? तुम्ही ते का नाही म्हटलं? तुम्ही पत्रकार परिषदा घ्या. तुम्ही असं म्हणा, मी त्यांना रोज सांगत असते. मी लढत असते हे ते सांगतात, ते खरं आहे. राष्ट्रीय समाज पक्ष हा माझं माहेर आहे. माझ्या भावाचं घर आहे, असंही त्या म्हणाल्या.

जानकर राजकीय वारस

राजकारणात माझं आदर्श सुषमा स्वराज आहेत. मी भाजपाची मध्यप्रदेशची इनचार्ज आहे. मी भाजपची प्रतिनिधी म्हणून आलेले नाही. भावाच्या पक्षाच्या कार्यक्रम म्हणून मी आले आहे. जानकरांच्या विधानपरिषदेच्या जागेसाठी मी भांडले. 31 मे ला महादेव जानकरांचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. गोपीनाथ मुंडे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर पहिलाचा कार्यक्रम झाला. तेव्हा गोपीनाथ मुंडेंनी सांगितलं की राजकीय वारसदार जानकर आहेत. आमचाही नेता चहा विकता विकता बनला की प्रधानमंत्री, असं त्या म्हणाल्या.

भाजपमुळे हित होणार नाही

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांचंही भाषण झालं. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. या देशाचा पंतप्रधान झाल्याशिवाय तुमच्या समाजाचं भलं होणार नाही. याचा विचार केला पाहिजे. आमच्या बहिणीच्या पार्टीमुले समाजाचं हित होणार नाही. आमच्या बहिणीच्या पार्टीमुळे समाजाचं हित होणार नाही. माझी बहीण मुख्यमंत्री बनेल पण समाजाचं हित होणार नाही. कारण रिमोट कंट्रोल इतरांच्या हातात राहील. मालक दुसराच राहील, असं जानकर म्हणाले.

रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार.
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप.
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड.
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश.
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू.
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.