नवी दिल्ली | 16 डिसेंबर 2023 : 13 डिसेंबर 2023 रोजी संसदेत घुसखोरी करणाऱ्या आरोपींकडे कसून चौकशी सुरु आहे. त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहे. अनेक खुलासे होत आहे. आता याप्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. आरोपींना कोणाकडून तरी फंडिंग झाल्याचे पण समोर येत आहे. आरोपी सागर शर्मा याच्या चौकशीतून पण धक्कादायक खुलासा झाला आहे. मनोरंजन, अमोल शिंदे, नीलम, ललित झा यांच्यासह काहींची नावे याप्रकरणात समोर आली आहे. पोलीस सखोल तपास करत आहेत.
काय होती योजना
सूत्रांच्या माहितीनुसार, सागर संसदेच्या बाहेर स्वतःला जाळून घेणार होता. जेल क्रीम खरेदीसाठी त्याने ऑनलाईन ऑर्डर दिली. पण पेमेंटमध्ये अडथळा आल्याने ऐनवेळी त्याने ही योजना रद्द केली. त्यामुळे हा अनर्थ टळला. त्याच्या या खुलाशाने यंत्रणेला पण झटका बसला. असे झाले असते तर संसद परिसरात मोठा गोंधळ उडाला असता.
सैन्यात भरतीचे स्वप्न भंगले
आरोपी सागर शर्मा हा इयत्ता 12वी उत्तीर्ण आहे. सैन्यात भरती होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्याने कसून प्रयत्न केले. अनेकदा प्रयत्न करुनही त्याला सैन्यात भरती होता आले नाही. त्याचे स्वप्न भंगले. त्यानंतर तो काही दिवस बेंगळुरुमध्ये राहिला. काही महिन्यापूर्वीच तो लखनऊमध्ये परतला आणि येथे ई-रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. आता त्याचे सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही.
डायरीत सापडले काय
सागर शर्मा याच्या लखनऊमधील घरात पोलिसांना एक डायरी मिळाली. यामध्ये घराचा निरोप घेण्याची वेळ आल्याचे त्याने सांगितले. सागरच्या कुटुंबियांनी त्याची ही डायरी स्थानिक पोलिसांना दिली. आता ही डायरी दिल्ली पोलिसांच्या हाती सोपविण्यात आली आहे. या डायरीत सागरने 2015 ते 2021 या काळात त्याच्या मनातील अनेक गोष्टी उतरवल्या आहेत. यामध्ये क्रांतीकारकांच्या विचारांसह काही कविता आणि विचार लिहिले आहे.
पेमेंट फेल झाल्याने योजना टळली
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सागरची चौकशी केली. त्यात त्याने संसदेबाहेर स्वतःला जाळून घेण्याच्या योजनेचा खुलासा केला. त्याने त्यासाठी एक जेल सारखी वस्तू ऑनलाईन खरेदी केल्याचे सांगितले. हे जेल शरीराला लावल्यावर त्वचा सुरक्षित राहते. कपडे जळतात, असा त्याचा दावा होता. पण ऑनलाईन पेमेंट फेल झाल्याने त्याने ही योजना सोडून दिली.