भारतात तब्बल 149 वर्षांनी गुरुपौर्णिमा-चंद्र ग्रहणाचा दुर्मिळ योग

काळाकुट्ट अंधार, लालभडक-मोठ्या आकाराचा चंद्र अशी अनोखी खगोल पर्वणी खंडग्रास चंद्रग्रहणाच्या निमित्ताने आज (16 जुलै) भारतीयांना अनुभवायला मिळणार आहे. भारतात आज होणार चंद्रग्रहण हे वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण आहे.

भारतात तब्बल 149 वर्षांनी गुरुपौर्णिमा-चंद्र ग्रहणाचा दुर्मिळ योग
Follow us
| Updated on: Jul 16, 2019 | 11:02 AM

Lunar Eclipse 2019 मुंबई : काळाकुट्ट अंधार, लालभडक-मोठ्या आकाराचा चंद्र अशी अनोखी खगोल पर्वणी खंडग्रास चंद्रग्रहणाच्या निमित्ताने आज (16 जुलै) भारतीयांना अनुभवायला मिळणार आहे. भारतात आज होणार चंद्रग्रहण हे वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण आहे. विशेष म्हणजे गुरुपौर्णिमा आणि चंद्रग्रहणचा एकत्रित दुर्मिळ योग तब्बल 149 वर्षांनी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आज होणारे चंद्रग्रहण ही खगोल प्रेमींसाठी एक विशेष पर्वणी समजली जात आहे.

‘या’ वेळेत पाहता येणार ? 

भारतात आज दिसणारे चंद्रग्रहण किमान 2 तास 59 मिनीटे राहणार आहे. भारतीय वेळेनुसार आज रात्री 1 वाजून 31 मिनीटांनी ग्रहणाला सुरुवात होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 17 जुलैला पहाटे 4 वाजून 31 मिनीटांनी ग्रहण संपेल. दरम्यान आज संध्याकाळी 6 नंतर देशभरात चंद्रदर्शन होणार आहे. विशेष म्हणजे 12 जुलै 1870 नंतर तब्बल 149 वर्षांनी गुरुपौर्णिमा आणि चंद्रग्रहणाचा खास पर्वणी खगोल अभ्यासकांना अनुभवता येणार आहे.

एकूण ग्रहण किती ? 

यंदाच्या वर्षात भारतात एकूण 5 ग्रहण आहेत. त्यात 3 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहणांचा समावेश आहेत. यातील एक चंद्रग्रहण वर्षाच्या सुरुवातीला 21 जानेवारीला झाले. मात्र हे चंद्रग्रहण भारतात दिसले नव्हते. मात्र त्यानंतर आज 16 जुलैला चंद्रगहणाचा योग आला आहे. विशेष म्हणजे भारतात हे चंद्रग्रहण दिसणार असून हे यंदाच्या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आहे. यानंतर भारतीयांना थेट 16 डिसेंबरला सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे.

‘या’ ठिकाणी दिसणार?

आज होणारे चंद्रग्रहण भारतासह संपूर्ण जगभरात पाहता येणार आहे. आशिया खंड, युरोप, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका यासह अन्य काही देशात ग्रहण पाहता येणार आहे. तसेच भारतात महाराष्ट्र, बिहार, आसाम, पश्चिम बंगाल या ठिकाणी पाहता येणार आहे.

दुर्बिणशिवाय पाहता येणार

दरम्यान आज भारतात होणारे चंद्रग्रहण हे तुम्ही उघड्या डोळ्यांनीही पाहू शकणार आहात. यासाठी तुम्हाला विशेष दुर्बीण किंवा इतर वस्तूंची गरज पडणार नाही. तसेच जर तुमच्याकडे दुर्बीण उपलब्ध असेल, तर तुम्हाला अत्यंत चागल्या पद्धतीने ग्रहण दिसेल.

ग्रहण म्हणजे काय?

सूर्य चंद्र आणि पृथ्वी जेव्हा एका रेषेत येतात. तेव्हा ग्रहण दिसते. चंद्र जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो, तेव्हा चंद्र सूर्याला झाकतो त्याला सूर्यग्रहण म्हणतात. या विरुद्ध जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सावलीत येतो. तेव्हा काही काळ चंद्रावर पृथ्वीची सावली पडल्यामुळे चंद्र दिसेनासा होतो किंवा अंधुक दिसतो याला चंद्रग्रहण म्हणतात. तसेच पृथ्वीची सावली चंद्राच्या थोड्या भागावर पडणे या स्थितीला खंडाग्रास चंद्रगहण म्हणतात.

खगोलप्रेमींसाठी विशेष पर्वणी

आज भारतात होणारे चंद्रग्रहण हे खंडग्रास पद्धतीचे आहे. यावेळी चंद्र हा लाल तांबूस रंगाचा दिसणार आहे. त्यामुळे आकाश लाल रंगाची उधळण झाल्यासारखे भासणार आहे. तसेच ग्रहणादरम्यान पृथ्वीवरुन चंद्र थोडा जवळ आणि मोठा दिसणार आहे.

‘या’ कारणामुळे चंद्रग्रहण खास

यंदाच्या वर्षातील पहिले चंद्रग्रहण 20 आणि 21 जानेवारीला रात्री लागले होते. त्यानंतर आज वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे. या खगोल शास्त्रीय स्थितीला खगोल तज्ज्ञांनी Half Blood Thunder Moon Eclipse असे नाव दिले आहे. ग्रहणादरम्यान चंद्राचा आकार आणि रंग रक्तासारखा लाल होणार असल्याने Half Blood Thunder Moon Eclipse असे नाव शास्त्रज्ञांनी सुचवले आहे. विशेष म्हणजे 12 जुलै 1870 नंतर तब्बल 149 वर्षांनी गुरुपौर्णिमा आणि चंद्रग्रहणाचा खास योग जुळून आला आहे. त्यामुळे आज होणारे ग्रहण  हे फार खास असल्याचे म्हटलं जात आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.