पतंजलीचा देशाच्या शेतकऱ्यांना हात,कच्च्या मालाच्या खरेदीतून कृषी समृद्धी
स्वामी रामदेव आणि आणि आचार्य बालकृष्ण यांनी स्थापन केलेल्या पतंजली आयुर्वेद कंपनीने आवळा, मध आणि एलोव्हेरा सारखा कच्चा माल खरेदी करुन शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा योग्य मोबदला देणे सुरु केले आहे.

पतंजली आयुर्वेद नैसर्गिक आणि हर्बल उत्पादनात भारतातील अग्रगण्य कंपनी आहे. अलिकडेच पतंजलीने नागपूरात आपल्या ‘मेगा फूड एण्ड हर्बल पार्क’चे उद्घाटन केले आहे. या योजनेतून स्थानिक कृषी क्षमता मजबूत करुन स्थानिकांना रोजगार देण्याची योजना आहे. त्यामुळे भारतासारखा कृषी प्रधान देश आत्मनिर्भर होत आहे.
शेतकऱ्यांच्या हातात पैसा
स्वामी रामदेव यांच्या पतंजली कंपनीने आपल्या आयुर्वेदिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांकडूनच कच्च्या मालाची खरेदी करण्याचे धोरण कायम ठेवले आहे. त्यात आवळ्यापासून ते मध, एलोव्हेरा या सारख्या वनस्पती पिकांचा समावेश आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळत आहे. त्यांना रोखीने पैसा मिळत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधरण्यास मदत मिळत आहे.
पतंजली कृषी क्षेत्रासाठी गेम-चेंजर ठरणार ?
पंतजली आयुर्वेद कंपनीने भारतात आधी FMCG क्षेत्रात बदल केला आहे. त्यांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ तयार केली आहे.खाद्य पदार्थांपासून सौदर्य प्रसाधनात पतंजलीची उत्पादने प्रसिद्ध झाली आहेत. पतंजलीची सर्व उत्पादन स्वस्त आणि गुणवत्ता पूर्ण असल्याने खूपच कमी भारतीय ब्रँडना जमलेय तर पतंजलीने करुन दाखवले आहे. पंतजलीची सर्व उत्पादने नैसर्गिक आणि आयुर्वेदिक आहेत. वैयक्तीक स्वच्छता आणि खाद्य पदार्थांपासून आरोग्यवर्धक आणि हर्बल औषधांपर्यंत पतंजलीवर विश्वास दाखवला जात आहे. असंख्य भारतीयांनी परदेशी उत्पादने सोडून पतंजलीचे ब्रँड वापरणे सुरु केले आहे.
शेतकऱ्यांना मदत
पतंजली आयुर्वेदाने सुरुवातीला मध, हर्बल ज्यूस, बिस्कीटे आणि दुग्धजन्य पदार्थ यासारख्या आरोग्य-केंद्रित उत्पादनांपासून सुरुवात केली होती.त्यानंतर हळूहळू हर्बल शाम्पू, टूथपेस्ट, स्कीनकेअर आणि केसांची काळजी अशा वैयक्तिक स्वच्छतेच्या उत्पादनांकडे पतंजली वळली. पतंजली आयुर्वेदिक औषधे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आणि सेंद्रिय पूरक आहार देखील तयार करते. भारतीयांना कोविड काळात पतंजलीने या आजारास लढण्यास मदत देखील केली आहे.
भारतीय शेतीची ऊर्जितावस्था
नागपूरमध्ये अलिकडेच पतंजलीने मेगा फूड अँड हर्बल पार्कचे उद्घाटन केले आहे. पतंजली कृषी प्रक्रिया आणि उत्पादन सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, हर्बल शेतीला प्रोत्साहन देणे आणि संपूर्ण भारतात पतंजलीचा विस्तार करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. पतंजली स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देऊन त्यांना प्रोत्साहन देत आहे. आयात केलेल्या वस्तूंवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि घरगुती, रसायनमुक्त उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतजली सक्रियपणे काम करीत आहे.