PFI-RSS News: पीएफआयची आरएसएसबरोबर तुलना ; भाजप म्हणते पोलीस अधिकाऱ्याची ही मानसिक दिवाळखोरी; पदावरून हटवण्याची मागणी
राजदने पाटणा एसएसपीच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. आरजेडी पाटणा यांनी ट्विट केले आहे की, "हे लोक शारीरिक प्रशिक्षणाच्या नावाखाली आपला प्रचार आणि द्वेष पसरवत असतात. त्या या संघाच्या कार्यपद्धतीबद्दल वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी केलेले वक्तव्य बरोबर असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
चंदीगडः पटनाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मानवजीत सिंह ढिल्लन (Senior Superintendent of Police Manavjit Singh Dhillon) यांनी आरएसएसची (RSS ) तुलना पीएफआयशी ( Popular Front of India (PFI)) केली होती. त्यानंतर संतप्त झालेल्या भाजपने त्यांना त्या पदावरून हटवण्याची मागणी केली होती. तर दुसरीकडे आरजेडी आणि एचएएमनेही वरिष्ठ पोलीस अधीक्षक ढिल्लन यांच्या या वक्तव्याचे समर्थन केले आहे. आता अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडून त्यांना कारणे दाखवा अशी नोटीस बजावण्यात आली आहे.
अतिरिक्त पोलीस महासंचालक जितेंद्र सिंह गंगवार यांनी पटनाच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक ढिल्लन यांना विचारले आहे की, तुम्ही असे वक्तव्य केला आहात का, आणि त्याबाबत तुम्ही 48 तासाच्या आता खुलासा करण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत.
भाजपमधून संतप्त प्रतिक्रिया
पटनाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मानवजीत सिंह धिल्लन यांनी पाटण्यात पीएफआयची तुलना आरएसएसशी केली होती. मानवजीत सिंह ढिल्लन यांनी सांगितले की, ज्या आरएसएसच्या शाखा आहेत त्यांच्याकडून स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे पीएफआयही आपल्या लोकांना शारीरिक प्रशिक्षण आणि मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षणदेखील देते. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्यामुळे त्यांना त्या पदावरून हटवण्याची मागणीही करण्यात येत आहे. तर त्यांच्या समर्थनाथ मात्रआरजेडी आणि एचएएमकडून भाजपवर टीका करण्यात आली आहे.
मानसिक दिवाळीखोरी
आरएसएसची पीएफआयशी तुलना करताना भाजपचे प्रवक्ते अरविंद कुमार सिंह म्हणाले की, पाटणाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक पीएफआयच्या प्रवक्त्यासारखे बोलत आहेत. त्यामुळे त्यांची त्या पदावरून हकालपट्टी करावी. भाजपचे फायरब्रँड नेते आणि आमदार हरीश भूषण ठाकूर म्हणाले की, वरिष्ठ पोलीस अधीक्षकांची त्यांच्या वक्तव्यातून त्यांची मानसिकता दिसत असून त्यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल तात्काळ माफी मागावी अन्यथा सरकारने त्यांना बडतर्फ करावे. या त्यांच्या वक्तव्यातून त्यांची मानसिक दिवाळीखोरी दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
एसएसपीच्या समर्थनार्थ आरजेडी आणि एचएएम
राजदने पाटणा एसएसपीच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. आरजेडी पाटणा यांनी ट्विट केले आहे की, “हे लोक शारीरिक प्रशिक्षणाच्या नावाखाली आपला प्रचार आणि द्वेष पसरवत असतात. त्या या संघाच्या कार्यपद्धतीबद्दल वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी केलेले वक्तव्य बरोबर असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
जाणीवपूर्वक वादात ओढले
दुसरीकडे, एचएएमचे प्रवक्ते डॉ. दानिश रिझवान म्हणाले की, वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना जाणीवपूर्वक वादात ओढले जात आहे. इस्लामिक स्टेटबद्दल बोलणे हा गुन्हा असेल, तर हिंदु राष्ट्राची वकिली करायला हरकत काय आहे असा सवालही त्यांनी केला आहे. इस्लामिक राष्ट्राची संकल्पना मांडणाऱ्यांना तुरुंगात टाकले जाते, तर मग हिंदू राष्ट्राच्या गप्पा मारणाऱ्यांना मुक्त का सोडल जाते? असा सवाल त्यांनी केला आहे.