Pension to Tree : झाडांना मिळणार पेन्शन! 75 वर्षांवरील वृक्षांसाठी या राज्य सरकारची खास योजना

Pension to Tree : या राज्य सरकारने मोठा चांगला पायंडा पाडला आहे. वयोवृद्ध झाडांच्या देखभालीसाठी पेन्शन योजना सुरु केली आहे. हा आदर्श प्रत्येक राज्य सरकारनेच नाही तर केंद्र सरकारने पण घेणे गरजेचे आहे. काय आहे ही खास योजना..

Pension to Tree : झाडांना मिळणार पेन्शन! 75 वर्षांवरील वृक्षांसाठी या राज्य सरकारची खास योजना
Follow us
| Updated on: Jun 22, 2023 | 6:13 PM

नवी दिल्ली : आपण निसर्गाप्रती कृतज्ञ कमी आणि कृतघ्न अधिक आहोत, ही नेहमीच ओरड होते. पण गेल्या काही वर्षांपासून निसर्ग संवर्धनाविषयी काही ना काही घडत आहे. आता या राज्य सरकारने देशासमोरच नाही तर जगासमोर मोठा आदर्श ठेवला आहे. अमृत महोत्सव म्हणजे वयाची 75 वर्षे मानवासाठी, निर्सगासाठी खर्ची घालणाऱ्या झाडांसाठी, वृक्षांसाठी या राज्य सरकारने पेन्शन योजना (Pension to Tree) लागू करण्याची घोषणा केली आहे. प्राणवायू देवता योजनेतून (Pranvayu Devata Scheme) अशा झाडांच्या संरक्षणासाठी निवृत्ती योजना कामी येईल. या हटके कल्पनेमुळे पर्यावरण प्रेमीच नाही तर सर्वसामान्य नागरीक ही हरकून गेले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी अशी सुरुवात ही काळाची गरज आहे.

हिरवेगार हरियाणा  वयोवृद्ध झाडांसाठी पेन्शन, निवृत्ती योजना सुरु करण्याचा बहुमान हरियाणा या राज्याने मिळवला आहे. लोकाभिमुख, निसर्गाभिमुख ही भूमिका कौतुकाचा विषय ठरली आहे. 75 वर्षांवरील झाडांना राज्य सरकारतर्फे पेन्शन देण्यात येणार आहे. कारण ही झाडे एक इतिहासच आहे. त्यांनी इतकी वर्षे वातावरणाचा, निसर्गाचा समतोल साधला आहे. आता त्यांचा तोल जाऊ नये यासाठी ही योजना महत्वाची ठरणार आहे.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अंभगातून वृक्षवल्लींचे महत्व अधोरेखित केले आहे. राज्याचे वनमंत्री चौधरी कंवर पाल यांनी या योजनेची माहिती मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याशी चर्चा केली. त्यांनी ही कल्पना उचलून धरली. राज्य सरकार प्रत्येक वर्षी या झाडांसाठी 2500 रुपये पेन्शन देणार आहे. ही रक्कम कमी असली तरी दरवर्षी त्यामध्ये अधिक रक्कमेची भर पडेल.

हे सुद्धा वाचा

इतक्या झाडांची निवड या योजनेसाठी सध्या 3 हजार 300 झाडांची निवड करण्यात आली आहे. झाडांची संख्या 4 हजारांपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. 75 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या झाडांना पेन्शन देण्यात येणार आहे. ही पेन्शन योजना वार्षिक असेल. पेन्शनची रक्कम दरवर्षी वाढविण्यात येईल.

असा करावा लागेल अर्ज घरा शेजारी, अंगणात अथवा शेतात 75 वर्षांपेक्षा अधिक वयाचे झाड असेल तर व्यक्तीला पेन्शनसाठी अर्ज करता येईल. जिल्ह्याच्या ठिकाणी, वन विभागातील कार्यालयात याविषयीचा अर्ज द्यावा लागेल. या अर्जावर विहित प्रक्रिया पूर्ण होईल. अर्जातील माहितीचा पडताळा करण्यात येईल. झाडाचे वय मोजण्यात येईल. त्यानंतर झाडाच्या संवर्धनाची जबाबदारी संबंधित व्यक्तीवर असेल. त्याला वार्षिक पेन्शनची रक्कम देण्यात येईल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.