Alcohol : झिंगालाला! या राज्यात दारुचा महापूर

Alcohol : या राज्यात मद्य ओसांडून वाहते. या राज्यातील लोक सर्वाधिक दारु पितात. पण ही राज्ये तुमच्या अंदाजाप्रमाणे ही राज्य गोवा अथवा पंजाब नाहीत. तर या राज्यात मद्याचा पूर ओसांडून वाहतो.

Alcohol : झिंगालाला! या राज्यात दारुचा महापूर
Follow us
| Updated on: Jul 29, 2023 | 4:41 PM

नवी दिल्ली | 29 जुलै 2023 : देशातील प्रत्येक राज्यात, गावात मद्यप्रेमी, दारुडे आढळतातच. पण देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक दारुची विक्री (Alcohol Sale) होते, माहिती आहे का? अनेकांना पहिल्यांदाच गोवा अथवा पंजाब या राज्यात सर्वाधिक दारु पिणारे असतील असे वाटत असेल. तर तसे नाही. देशातील विविध राज्यातील मद्य विक्रीचे आकडे वेगवेगळे आहेत. काही लोक तर रोज दारु पितात. तर काही कधी कधी दारु पितात. एका रिपोर्टनुसार, देशातील जवळपास 16 कोटी लोक अल्कोहल सेवन करतात. देशात दरवर्षी अब्जावधी लिटर दारु रिचवल्या जाते. पण या राज्यात सर्वाधिक दारुची विक्री होते. या राज्यात मद्य ओसांडून वाहते. या राज्यातील लोक सर्वाधिक दारु पितात.

मोठा महसूल

देशातील जवळपास सर्वच राज्यात दारुची विक्री होते. दिल्ली, गोवा, पंजाबसह अनेक राज्य सरकारला मद्यविक्रीतून मोठा महसूल मिळतो. मद्यावर सर्वाधिक उत्पादन शुल्क मिळते. त्यामुळे राज्य सरकारला मोठी कमाई होते. एकीकडे सरकार दारुबंदीसाठी अभियान राबविते. पण त्याच्या उत्पन्नाचा मोठा स्त्रोत मद्यविक्रीवरील कर असतो. पुरुष सर्वाधिक दारु पितात. तर दारु सेवन करण्यात महिलांची संख्या कमी आहे.

हे सुद्धा वाचा

या राज्यात मद्याचा पूर

अरुणाचल प्रदेश हे देशातील मद्य विक्रीत सर्वात आघाडीवर आहे. या राज्यातील 53% हून अधिक लोक दारु सेवन करतात. दुसऱ्या क्रमांकावर तेलंगाणा राज्य आहे. या राज्यात 43% अधिक लोक मद्यप्रेमी आहेत.

या राज्यात महिला पण मद्यप्रेमी

भारतीय महिला पण दारु पिण्यात मागे नाही. अरुणाचल प्रदेशात 15 वर्षांवरील सर्व महिला दारु पितात. हे प्रमाण 24% इतके आहे. महिलांचे दारु पिण्याचे प्रमाण केवळ अरुणाचल प्रदेशातच नाही तर सिक्कीममधील महिला पण दारु पितात. या ठिकाणी जवळपास 16% महिला दारु पितात.

दिल्ली, पंजाब सर्वात मागे

आरोग्य आणि कुटुंब कल्याणच्या एका सर्व्हेनुसार, 15 ते 40 वयोगटातील लोक सर्वात जास्त दारुचे सेवन करतात. यामध्ये तेलंगाणा, अरुणाचल प्रदेश, आसाम या राज्याचा सर्वाधिक क्रमांक लागतो. ब्रह्मपुत्र क्षेत्र, झारखंड, छोटा नागपूर याभागातील लोक दारु पितात. छत्तीसगडमधील बस्तर, ओडिशा ही राज्य यामध्ये सहभागी आहेत. तर 30 ते 40 टक्के दारु पिणारे उत्‍तराखंड, मणिपुर, मेघलय, त्रिपुरा आणि ओडिशा या राज्यातील मोठा भाग सहभागी आहे. तर दिल्ली, पंजाब, युपी, गुजरात, राजस्थान आणि गोवा या भागातील लोकांचे दारु पिण्याचे प्रमाण केवळ 20 टक्के आहे.

हे आहे मद्यराष्ट्र

दारु रिचविण्यात सर्वात अग्रेसर आहे सेशल्स हा देश. हा आफ्रिकन खंडातील देश आहे. 115 बेटांचा मिळून हा देश आहे. या देशात वार्षिक प्रति व्यक्ती 20.5 लिटर मद्य रिचवतो. हे अत्यंत सुंदर बेटांचा देश आहे. या देशात पर्यटक आवर्जून हजेरी लावतात. त्यामुळेच हे मद्यराष्ट्र म्हणून ओळखले जाते.

Non Stop LIVE Update
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय.
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना...
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना....
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी.
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत.
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी....
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी.....
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर.
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय.
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन.
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा.
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी.