Qutub Minar | कुतुब मिनारच्या आतल्या मशिदीत हिंदू, जैन मंदिरं? वाचा काही धक्कादायक माहिती

दिल्लीच्या साकेत न्यायालयात कुतुब मिनार परिसरात असलेल्या कुव्वत उल इस्लाम मशिदीत हिंदू आणि जैन देवांची पुजा करण्याची मागणी करण्यात आली होती.

Qutub Minar |  कुतुब मिनारच्या आतल्या मशिदीत हिंदू, जैन मंदिरं? वाचा काही धक्कादायक माहिती
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 2:41 PM

नवी दिल्ली : दिल्लीच्या साकेत न्यायालयात कुतुब मिनार परिसरात असलेल्या कुव्वत उल इस्लाम मशिदीत (Mosque In Qutub Minar) हिंदू आणि जैन देवांची पुजा करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, इतिहासकारांनी या याचिकेला फेटाळून लावलं आहे. इतिहासाची समज नसल्याने कदाचित ही मागणी करण्यात आली असावी. तसेच, यामुळे जातीयवाद वाढू शकतो, असं काही इतिहासकारांनी सांगितलं (Mosque In Qutub Minar).

टाईम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, इतिहास हा सार्वजनिक मतांचा विषय नाही. तुम्ही 12 व्या शतकातील एखाद्या तथ्याला त्याच्या संदर्भापासून वेगळं नाही करु शकत, नाही याला 21 व्या शतकात सादर करुन पीडित असल्याचा दावा करु शकत, असं मत इतिहासकार आणि प्राध्यापक हरबंस मुखिया यांनी व्यक्त केलं.

तिहासकार आणि प्राध्यापिका असलेल्या कॅथरीन बी अशर या देखील या याचिकेशी सहमत नाहीत. त्या ठिकाणची इतिहास हा महत्त्वपूर्ण असू शकतो. पण त्याला हिंदू किंवा जैन मंदिरात बदलणं हे इतिहासाला नष्ट करण्यासारखं असेल, असं त्या म्हणाल्या.

दिल्लीच्या इतिहासकार डॉक्टर स्वपना लिडल ज्यांनी 19 व्या दशकात ‘सौर उल-मंजिल’चं इंग्रजित भाषांतर केलं होतं, त्यांच्या मते, “युद्धात मंदिरे नष्ट झाली नाहीत, हे कोणीही नाकारू शकत नाही. संपूर्ण रेकॉर्डसाठी एखाद्याला योग्य माहिती असणे आवश्यक आहे. 1132 शतकात तोमर साम्राज्याच्या एका मंत्र्याने बनवलेलं भव्य जैन मंदिर, ज्याचं नाव साहू नट्टल होतं. त्याला दिल्लीवरील विजयानंतर मोहम्मद गौरीच्या सेनेने नष्ट केलं होतं. पण, आसपासचे इतर मंदिरं जसे महरोलीमधील दादाबाडी जैन मंदिर आणि जोगमाया मंदिर यांना काहीही नुकसान पोहोचवण्यात आलेलं नाही”. (Mosque In Qutub Minar)

कुव्वत उल इस्लाम मशिदीविरोधात साकेत न्यायालयात याचिका

दिल्लीच्या कुतुब मिनार परिसरात असलेल्या मशिदीबाबत साकेत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. कुतुब मिनार परिसरात असलेल्या कुव्वत उल इस्लाम मशिदीला 27 हिंदू आणि जैन मंदिरांना तोडून बनवण्यात आली होती. याचे सर्व पुरावेही असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे, केंद्र सरकारने एका ट्रस्टची निर्मिती करावी, जो तिथे देवी-देवतांची पुनर्स्थापना करुन त्यांच्या पूजेची व्यवस्था आणि प्रशासनाचं काम पाहिल, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. त्यासाठी अयोद्धा निर्णयाचा दाखलाही देण्यात आला आहे.

आता या प्रकरणात पुढील सुनावणी ही 24 डिसेंबरला होणार आहे. पहिले ही याचिका साकेत न्यायालयात जैन तिर्थकर ऋषभ देव आणि भगवान विष्णू यांच्या नावाने दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी भारत सरकार आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण एएसआयला प्रतिवादी ठेवण्यात आलं आहे.

Mosque In Qutub Minar

संबंधित बातम्या :

New Year 2021 | अनलॉक अँड एक्सप्लोर, नव्या वर्षात भारतातील ‘या’ 5 ठिकाणांना नक्की भेट द्या!

बापरे! तब्बल 11 वेगवेगळ्या प्रकारे वाजवला जातो ट्रेनचा ‘हॉर्न’, साखळी खेचताच वाजते शिट्टी!

PHOTO | पर्यटनासाठी सर्वात धोकादायक असलेले 14 देश, ‘या’ देशांमध्ये अजिबात फिरायला जावू नका

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.