Shri Krishna Janmabhoomi Case : श्रीकृष्ण जन्मभूमी वादप्रकरणी याचिका न्यायालयात दाखल; मथुरेत आनंद, भाविक म्हणाले-तुम्ही पण दर्शनासाठी या
जिल्हा न्यायालयाने याचिका दाखल करून घेतल्यानंतर आता या वादग्रस्त स्थळाच्या सर्व्हेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे न्यायालयाने आज जो निर्णय घेतला तो योग्य आहे. त्याचे स्वागत आहे अशी प्रतिक्रीया पंडित अनिल महाराज यांनी दिलेली आहे.
मथुरा : अख्या देशाचे लक्ष हे सध्या ज्ञानवापी मशीद (Gyanvapi mosque)वादाच्या सुनावणीवर लागून राहीलेले आहे. तर देशातील मुस्लिम समाजाचेही या निर्णयावर लक्ष लागलेले असून बाबरीनंतर ज्ञानवापीही जाणार की काय अशी कुजबूज देशात सुरू आहे. तर यावरून एएमआयएम पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असादुद्दीन ओवैसी ही सतत आवाज उठवत आहेत. असे धार्मिक धृविकरणाचे वातावरण देशात सुरू असतानाच आता मथुरा जिल्हा न्यायालयाने श्रीकृष्ण जन्मभूमी– शाहीईदगाह वाद (Shrikrishna Janmabhoomi-Shahi Eidgah controversy) प्रकरणी याचिका रिव्हिजनसाठी दाखल करून घेतली आहे. ही याचिका वकील रंजना अग्नहोत्री यांनी सादर केली आहे. त्यावर आता येत्या 1 जुलै रोजी यावर सुनावणी होणार आहे. तर श्रीकृष्ण भक्त असल्याचं सांगत वकील हरिशंकर जैन, विष्णूशंकर जैन आणि रंजना अग्निहोत्री यांनी ही याचिका दाखल केली आहे. तर याप्रकरणी श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्ट, श्री कृष्ण जन्मभूमी सेवा संस्थान, सुन्नी सेंट्रल बोर्ड, शाही ईदगाह आणि मशीद कमिटी यांनी प्रतिवादी करण्यात आलं आहे. श्रीकृष्णाच्या जन्मभूमीच्या जमिनीवर शाही ईदगाह मशीद उभारण्यात आली असून ही मशीद हटवण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याबाबत आधीही कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, ती फेटाळण्यात आली होती. त्यानंतर या वकिलांनी मथुरा जिल्हा न्यायालयात (Mathura District Court)धाव घेतली. ज्यानंतर ती आता ऑनलाईन स्वरूपात स्विकारली आहे. मथुरा न्यायालयाने याचिका दाखल करून घेतल्याने सध्या मथुरेत सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे.
तुम्हीही दर्शनासाठी या
मथुरा न्यायालयाने याचिका दाखल करून घेतल्याने सध्या मथुरेत सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे येथे आलेले भाविक ही याचा क्षणांचा आनंद सांगताना म्हणत आहेत की, कोर्टाने आज हिंदू पक्षकारांची याचिका स्वीकारली आहे. त्यामुळे मथुरा जिल्हा न्यायालयाने जो निर्णय दिला आहे तो चांगला आणि स्वागताहर्त आहे. मथुरा ही भगवान श्रीकृष्णांची जन्मभूमी आहे. त्यामुळे येथे भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. तर आता ही भाविक मोठ्या संख्येने भगवान श्रीकृष्णांच्या जन्मस्थानावर दर्शनासाठी आलेले आहेत लोकांना चांगला आनंद वाटतो आहे. भगवान श्रीकृष्ण दर्शन करून लोकांना आवाहन करत आहे तुम्ही पण दर्शनासाठी या.
न्यायालयाचा निकाल स्वागत योग्य आहे
जिल्हा न्यायालयाने याचिका दाखल करून घेतल्यानंतर आता या वादग्रस्त स्थळाच्या सर्व्हेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे न्यायालयाने आज जो निर्णय घेतला तो योग्य आहे. त्याचे स्वागत आहे अशी प्रतिक्रीया पंडित अनिल महाराज यांनी दिलेली आहे. तसेच ते म्हणाले, भगवान श्रीकृष्णाच्या जन्मस्थली मथुरा आहे. काही वर्षांपूर्वी भगवान श्री श्रीकृष्ण जन्मभूमिवर अवैद्य मजिद निर्माण झाली. श्रीकृष्णाच्या परिसरामध्ये अवैध कब्जा आहे. त्याच्या सुनावणीसाठी कोर्टामध्ये पिटीशन फाईल करण्यात आली. त्याला कोर्टाने आज मंजूरी दिली आहे. तसेच त्याची सुनावणीसाठी जुलै महिन्यातील तारीख दिलेली आहे. त्यामुळे आता योग्य निर्णय होईल असं वाटतं आहे. त्याच बरोबर ते म्हणाले, मात्र गेल्या वेळी जी याचिका दाखल करण्यात आली होती त्याला कोर्टाने फेटाळली होती.
काय आहे प्रकरण?
रंजना अग्निहोत्री या सर्वोच्च न्यायालयातील वकील आहेत. राम जन्मभूमी प्रकरणातही त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांनी श्रीकृष्ण जन्मस्थळाच्या 13.37 एकर जमिनीवर दावा केला आहे. ही जमीन श्रीकृष्ण जन्मस्थळाची आहे. पण त्यावर शाही ईदगाह निर्माण करण्यात आला आहे. याच जमिनीवर श्रीकृष्ण जन्मभूमी आणि मंदिराचं गर्भगृह आहे. या मुद्द्यावरून अग्निहोत्री आणि इतर वकिलांनी याचिका दाखल केली आहे.