Petrol & Diesel: पेट्रोल-डिझेलचे दर आता खाली यायला सुरुवात होईल; भाजपच्या केंद्रीय नेत्याचे महत्त्वपूर्ण संकेत
आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाचे दर घसरल्यानंतर आम्ही त्याचा फायदा सामान्य ग्राहकांपर्यंत हस्तांतरित करायला सुरुवात केली होती. | Petrol Diesel rates
नवी दिल्ली: कोरोना संकटामुळे झालेले आर्थिक नुकसान आणि इंधनाचे चढे दर अशा कात्रीत सापडलेल्या सर्वसामान्य लोकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आगामी काळात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे दर (Diesel prcie) खाली घसरतील, असे महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. (Petrol and Diesel prices will decrease in near future says Dharmendra Pradhan)
त्यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचे (LPG) दर आता कमी व्हायला सुरुवात होईल. आगामी काही दिवसांमध्ये ते दिसून येईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाचे दर घसरल्यानंतर आम्ही त्याचा फायदा सामान्य ग्राहकांपर्यंत हस्तांतरित करायला सुरुवात केली होती. त्याचे परिणाम आता दिसून येतील, असा दावा धर्मेंद्र प्रधान यांनी केला. त्यामुळे कोरोना संकटामुळे मेटाकुटीला आलेल्या सामान्य लोकांना काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Petrol, diesel & LPG prices have started reducing now & they’ll reduce further in the coming days. We had stated earlier also that we’ll transfer benefit from decrease in crude oil prices in international market to the end customers: Dharmendra Pradhan, Union Petroleum Minister pic.twitter.com/cG3SO3E7bg
— ANI (@ANI) April 4, 2021
पेट्रोल- डिझेलचे आजचे दर काय?
पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार, आज सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती न बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी, गेल्या 10 दिवसांत तेल कंपन्यांनी किंमती 3 वेळा कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. यापूर्वी 30 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्यात आल्या होत्या. यामध्ये पेट्रोल 22 पैशांनी तर डिझेल 23 पैशांनी स्वस्त झाले होते.
आज राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 90.56 रुपये आहे. तर आज डिझेलची किंमत प्रति लिटर 80.87 रुपये आहे. त्याचप्रमाणे आर्थिक राजधानी मुंबईत आज पेट्रोलची किंमत 96.98 रुपये तर डिझेलची किंमत प्रतिलिटर 87.96 रुपये आहे. इंडियन ऑईलच्या अधिकृत संकेतस्थळावरून ही माहिती घेण्यात आली आहे.
पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा
एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.
त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.
(Petrol and Diesel prices will decrease in near future says Dharmendra Pradhan)