Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या स्थिर दरामुळे सामान्यांना दिलासा, आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता

पेट्रोल-डिझेलच्या दरात आज 17 व्या दिवशी देखील सामान्यांना दिलासा मिळाला आहे. देशातील तेल कंपन्यांनी आज तेलाच्या किमतीत कोणतेही बदल केले नाहीत.

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या स्थिर दरामुळे सामान्यांना दिलासा, आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता
पेट्रोल-डिझेलच्या स्थिर दरामुळे सामान्यांना दिलासाImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 9:01 AM

नवी दिल्ली – पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या (Diesel) दरात आज 17 व्या दिवशी देखील सामान्यांना दिलासा मिळाला आहे. देशातील तेल कंपन्यांनी आज तेलाच्या किमतीत कोणतेही बदल केले नाहीत. स्थिर दरामुळे सर्वसामान्यांना सर्वाधिक दिलासा मिळत आहे. दुसरीकडे कच्च्या तेलाच्या (Crude oil) किमतीत वाढ सुरूच आहे. डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल 104 पर्यंत वाढले आणि ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 108.6 च्या पातळीवर पोहोचले. त्यामुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर

शहर                         पेट्रोल                  डिझेल

अहमदनदगर            120.40                103.10

औरंगाबाद                 121.13                 103.79

चंद्रपूर                       121.09                 103.79

सातारा                      121.55                 104.20

परभणी                      123.51                106.10

नागपूर                       120.40               103.73

पेट्रोल आणि डिझेलचे दर 10 रुपयांनी वाढले

पाच राज्यांचे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर 22 मार्चपासून तेल कंपन्यांनी किमती वाढवण्यास सुरुवात केली होती. 22 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत लिटरमागे 10 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. शेवटची वाढ 6 एप्रिल रोजी प्रति लिटर 80 पैसे होती.

सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये उपलब्ध आहे

देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये उपलब्ध आहे. येथे पेट्रोल 91.45 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 85.83 रुपये प्रति लिटर आहे. त्याच वेळी, गंगानगर (राजस्थान) मध्ये पेट्रोलचा दर 122.93 रुपये आणि डिझेलचा दर 105.34 रुपये प्रति लिटर आहे. पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर साडेचार महिन्यांनी कंपन्यांकडून दरात बदल करण्यात आला. याआधी दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये प्रतिलिटर विकले जात होते.

  1. दिल्ली: पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर
  2. मुंबई : पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर
  3. चेन्नई: पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर
  4. कोलकाता: पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लिटर
  5. लखनौ : पेट्रोल 105.25 रुपये आणि डिझेल 96.83 रुपये प्रति लिटर
  6. नोएडा : पेट्रोल 105.43 रुपये आणि डिझेल 97.03 रुपये प्रति लिटर
  7. पाटणा: पेट्रोल 116.23 रुपये आणि डिझेल 101.06 रुपये प्रति लिटर
  8. पोर्ट ब्लेअर : पेट्रोल 91.45 रुपये आणि डिझेल 85.83 रुपये प्रति लिटर
  9. गंगानगर (राजस्थान) मध्ये पेट्रोल 122.93 रुपये आणि डिझेल 105.34 रुपये प्रति लिटर

Saamana : मास्क पुन्हा अनिवार्य होणार! शिवसेनेकडून सामना अग्रलेखाच्या माध्यमातून थेट संकेत

Kalyan Dombivali No Electricity : पहाटे 4 वाजल्यापासून कल्याण, डोंबिवली परिसराची बत्ती गुल! नागरीक हैराण

Big News: देवगिरी एक्स्प्रेसवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न! रेल्वे डब्यांवर तुफान दगडफेक झाल्यानं खळबळ

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.