नवी दिल्ली – पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या (Diesel) दरात आज 17 व्या दिवशी देखील सामान्यांना दिलासा मिळाला आहे. देशातील तेल कंपन्यांनी आज तेलाच्या किमतीत कोणतेही बदल केले नाहीत. स्थिर दरामुळे सर्वसामान्यांना सर्वाधिक दिलासा मिळत आहे. दुसरीकडे कच्च्या तेलाच्या (Crude oil) किमतीत वाढ सुरूच आहे. डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल 104 पर्यंत वाढले आणि ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 108.6 च्या पातळीवर पोहोचले. त्यामुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे.
शहर पेट्रोल डिझेल
अहमदनदगर 120.40 103.10
औरंगाबाद 121.13 103.79
चंद्रपूर 121.09 103.79
सातारा 121.55 104.20
परभणी 123.51 106.10
नागपूर 120.40 103.73
पाच राज्यांचे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर 22 मार्चपासून तेल कंपन्यांनी किमती वाढवण्यास सुरुवात केली होती. 22 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत लिटरमागे 10 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. शेवटची वाढ 6 एप्रिल रोजी प्रति लिटर 80 पैसे होती.
देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये उपलब्ध आहे. येथे पेट्रोल 91.45 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 85.83 रुपये प्रति लिटर आहे. त्याच वेळी, गंगानगर (राजस्थान) मध्ये पेट्रोलचा दर 122.93 रुपये आणि डिझेलचा दर 105.34 रुपये प्रति लिटर आहे. पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर साडेचार महिन्यांनी कंपन्यांकडून दरात बदल करण्यात आला. याआधी दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये प्रतिलिटर विकले जात होते.