प्राध्यापक, शिक्षक आणि ग्रंथपाल ज्यांनी पीएफआयची विषवल्ली फोफावून सोडली..
गेल्या आठवड्यात 22 सप्टेंबर रोजी टाकलेल्या छाप्यांमध्ये या तीन महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक, अरबी भाषेचे शिक्षक आणि एका ग्रंथपालचाही समावेश आहे.
नवी दिल्लीः केंद्र सरकारने (Central Government) पीएफआयवर ठोस कारवाई करत संघटनेर बंदी घातल्यानंतर त्याचे धागेदोरे आता बाहेर येऊ लागले आहेत. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आल्यानंतर त्याचे राजकीय वर्तुळात आता पडसाद उमटू लागले आहेत. पीएफआय ही संघटना बर्याच काळापासून चर्चेत आहे. मात्र गेल्या आठवड्यात देशातील संस्थेच्या कार्यलयावर आणि नेत्यांवर छापे टाकण्यात आले, त्यामुळे ही संघटना पुन्हा चर्चेत आली.
केंद्राकडून केलेल्या कारवाईत मोठ्या संख्येने अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. आणि नंतर अटकही केली गेली आहे.
गेल्या आठवड्यात 22 सप्टेंबर रोजी टाकलेल्या छाप्यांमध्ये या तीन महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक, अरबी भाषेचे शिक्षक आणि एका ग्रंथपालचाही समावेश असल्याचे सांगितले आहे.
ज्या तीन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे ते तिघेही आता सत्तरीत आहेत. या तीन लोकांनीच 1992 मध्ये राष्ट्रीय विकास आघाडीची स्थापना केली होती. आणि त्यानंतर त्यांनी पीएफआयची स्थापना करुन ती यशस्वीपणे चालवलीही होती.
आज मात्र सकाळपासून केंद्र सरकारकडून पीएफआय संबंधित असलेल्या संघटना कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया, रिहॅब इंडिया फाउंडेशन, ऑल इंडिया इमाम कौन्सिल, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्युमन राइट्स ऑर्गनायझेशन, नॅशनल वुमेन्स फ्रंट, ज्युनियर फ्रंट, एम्पॉवर इंडिया फाउंडेशन आणि रिहॅब फाऊंडेशन या संघटनांवर आता 5 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये प्रोफेसर पी. कोया, ई. अबुबकर आणि ईएम अब्दुल रहिमन यांचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात 22 सप्टेंबर रोजी पीएफआयचे एकूण 45 नेत्यांना आणि सदस्यांना अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर मंगळवारी पीएफआय पदाधिकाऱ्यांना देशभरातून अटक केली गेली आहे.
केरळमधील कोझिकोड येथील सरकारी कला महाविद्यालयात शिकवणारे प्रोफेसर पी. कोया हे तरुणपणात डाव्या विचारसरणीचे मानले जात होते.
कोया हे किशोरवयात नास्तिक होते असंही सांगितले गेले आहे. त्यानंतर मात्र ते जमात-ए-इस्लामी हिंदमध्ये सामील झाले. आणि त्या नंतर 1970 च्या दशकात अलिगडमधील स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) मध्येही सहभागी झाला.
त्याच वेळी, इतर दोन तरुण (ई अबुबकर आणि ईएम अब्दुल रहिमन) भेटले जे नंतर कोयाच्या जीवनात सामील झाले, ते दोघेही सिमीचाच भाग होते. अबुबकर हा कोझिकोडचा रहिवासी होता, तर रहमान एर्नाकुलममध्ये राहत होता.
शिक्षणानंतर मात्र या तिघांनी वयाच्या 30 व्या वर्षी सिमी सोडली होती. नंतर ही संघटना अतिरेकी मुस्लिम संघटना म्हणून ओळखली जात होती.
वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय निरीक्षक सी दाऊद यांनी सांगितले की सिमीच्या घटनेनुसार वयाच्या तीस वर्षांहून अधिक काळ कोणीही संस्थेत राहू शकत नाही.
त्या काळात या तीन लोकांनी सिमी सोडली असली तरी या तिघांनी 1980 च्या दशकात मात्र केरळमधील स्थानिक मुस्लिम तरुण आणि विद्यार्थी संघटनांशी यांनी आपले जवळचे संबंध प्रस्थापित केले होते.
त्यामुळे सुरुवातीच्या काळात यांनी वायनाड मुस्लिम असोसिएशन, मुस्लिम ब्रदर्स क्लब, मुस्लिम टास्क फोर्स आणि यंगस्टर्स असोसिएशन. पण राष्ट्रीय लोकशाही आघाडी अशा संघटना 1990 च्या काळात सुरु केल्या गेल्या.