महाराष्ट्र एटीएसने पीएफआयचे सगळे डाव उधळले…; अग्रवालांचा खळबळजनक दावा..
पीएफआय ही संघटना 2047 पर्यंत देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याची योजना आखत होती. समाजात द्वेष पसरवणे हाच त्यांचा एकमेव हेतू होता.
मुंबईः पीएफआय या संघटनेवर देशातील अनेक ठिकाणी कारवाई केल्यानंतर आता पुन्हा एकदा तपास यंत्रणांकडून कसून चौकशी सुरु करण्यात आली आहे. ही चौकशी सुरु असतानाच महाराष्ट्र एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल (Maharashtra ATS chief Vineet Agarwal) यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. 2047 पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र (Islamic nation) बनवणे हे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनांचे (PFI) उद्दिष्ट होते. यासाठी देशभरात पीएफआयच्या शाखांचे जाळे विणले जात होते असंही सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर ठिकठिकाणी लोकांना व्याख्यानं देऊन संघटनेचा विचार त्यांच्या मनात बिंबवला जात होता.
त्याचबरोबर आपापल्या घराच्या छतावर स्व-संरक्षणासाठी विटा, दगड आणि धारदार शस्त्रे ठेवण्याचा सल्लाही दिला जात असल्याचे एटीएस प्रमुखांनी सांगितले.
महाराष्ट्र एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांचा दावा केला आहे की, पीएफआय स्वतःला एक सामाजिक संस्था म्हणून सांगत असले तरी त्यामध्ये सत्यता नसल्याचेही सांगितले गेले आहे.
एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये महाराष्ट्र एटीएस प्रमुखांनी सांगितले की, ‘पीएफआय ही संघटना सामाजिक विकास, हक्क आणि न्याय आणि शारीरिक व्यायामा यासारख्या कामांसाठी मदत करणारी संस्था म्हणून सांगत असते.मात्र त्यामध्ये सत्यता नसल्याचे सांगण्यात आले आहे.
विनीत अग्रवाल यांनी पीएफआय या संघटनेविषयी माहिती देताना सांगितले की, आम्ही डेटा आणि पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत.
2047 पर्यंत देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याची पीएफआयकडून योजना आखण्यात आली होती. समाजात द्वेष पसरवण्यासाठी आणि लोकांची दिशाभूल करण्यातही या संघटनेचा हात होता असंही त्यांनी सांगितले.
त्यांच्या हेतूने टार्गेट ओळखून अडथळे निर्माण करून खुनाचा कट रचला जात होता. आम्ही लवकरच त्याचे खाते गोठवणार आहोत.