हेलिकॉप्टर दुर्घटनेतील पायलटचा उपचारादरम्यान मृत्यू, संरक्षण मंत्रालयाची माहिती
जम्मू काश्मीरच्या गुरेज सेक्टरच्या बरौम भागात आज सकाळी हेलिकॉप्टर दुर्घटना घडली होती. भारतीय सेनेचं चीता हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं होतं. सुरुवातीला समोर आलेल्या वृत्तानुसार एका हेलिकॉप्टर पायलटचा मृत्यू झाला होता, तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला होता.
जम्मू-काश्मीर : जम्मू काश्मीरच्या (Jammu kashmir) गुरेज सेक्टरच्या बरौम भागात आज सकाळी हेलिकॉप्टर दुर्घटना (helicopter crash) घडली होती. भारतीय सेनेचं चीता हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं होतं. सुरुवातीला समोर आलेल्या वृत्तानुसार एका हेलिकॉप्टर पायलटचा मृत्यू झाला होता, तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला होता. दरम्यान, आता उपचारादरम्यान दुसऱ्याही पायलटचा मृत्यू (Indian Pilot death) झाला असल्याचं समोर आलं आहे. मेजर संकल्प यादव हे 29 वर्षाचे होते. या सह-वैमानिकाचा 92 बेस हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला असल्याची माहिती संरक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. अपघातानंतर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू होते. मात्र मृत्युशी त्यांची झुंज अपयशी ठरली आहे. कित्येक प्रयत्नानंतरही त्यांना वाचवण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे देशभरातून सध्या हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
एएनआय वृत्तसंस्थेचे ट्विट
Maj Sankalp Yadav, 29 years old, the co-pilot succumbed to his injuries at 92 Base Hospital. The injured pilot is critical, however stable and is presently in ICU at 92 Base Hospital. Events leading to the crash of the helicopter are being ascertained: PRO (Defence), Srinagar
— ANI (@ANI) March 11, 2022
पुन्हा मोठी हेलिकॉप्टर दुर्घटना
गेल्या काही दिवसा घडलेल्या हेलिकॉप्टर अपघाताच्या घटनेने देशाला हादरवून सोडले आहे. काही महिन्यांपूर्वीच हेलिकॉप्टर अपघातातत सीडीएस बीपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासह इतर काही अधिकाऱ्यांच्या मृत्युने देशाला हादरवून सोडले होते. त्या घटनेच्या जखमा आजून ताज्या असताना पुन्हा एक हेलिकॉप्टर अपघाताची घटना समोर आल्याने खळबळ माजली आहे. सकाळी एका पायलटचा मृत्यू झाल्याची माहिती संरक्षण विभागाकडून देण्यात आली होती. तर दुसऱ्या पायलटला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हेलिकॉप्टर दुर्घटना वाढल्या
जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात भारतीय सैन्य रात्रीचा दिवस एक करून पहारा देत आहे. सीमेपलीकडील दुश्मनांशी आणि दहशतवाद्यांशी मोठ्या हिमतीने लढत आहे. मात्र अशा दुर्घटना सैनिकांसोबतच घडल्यावर देशाच्या डोळ्यात पुन्हा पाणी उभा राहतं. या हेलिकॉप्टर दुर्घटनेने भारतीय सैन्याला आणि देशवासियांना पुन्हा नव्या जखमा दिल्या आहेत. गेल्या काही दिवसात हेलिकॉप्टर दुर्घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
UP Election | लखीमपूर, हाथरस, उन्नाव, जिथल्या घटनांमुळे देशभर भाजपची नाचक्की झाली तिथं कोण जिंकलं?
गोव्यात फडणवीसांच्या भूमिकेला रवी नाईकांचा खो, महाराष्ट्र गोमंतकला सोबत घेण्यास विरोध, काय घडतंय?