Terrorists arrested : 2047 पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या प्लॅन; दोन संशयित दहशतवाद्यांना अटक, पाटणा पोलिसांची मोठी कारवाई
पाटणा पोलिसांनी दोन संशयित दहशतवाद्यांना (Patna Police Arrested Two Terrorists) अटक केली आहे. हे दोन्ही दहशतवादी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी (PFI) संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे.
पाटणा : पाटणा पोलिसांनी दोन संशयित दहशतवाद्यांना (Patna Police Arrested Two Terrorists) अटक केली आहे. हे दोन्ही दहशतवादी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी (PFI) संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू असून, त्यांच्याकडून काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या कागदपत्रावरून हे व्यक्ती 2047 पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या उद्देशाने तसेच भारतात पुन्हा एकदा मुघलांची सत्ता आणण्यासाठी काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. हे व्यक्ती मार्शल आर्टच्या नावाखाली शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी शिबिर देखील चालवत होते. या व्यक्तींकडून विशिष्ट समुदायाच्या व्यक्तींना अशाप्रकारे शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते, अशी माहिती पोलिसांच्या (Police) वतीने देण्यात आली आहे.
एक सेवानिवृत्त पोलीस
पाटणाचे एएसपी मनिष कुमार यांनी याबाबत बोलताना सांगितले की, सबंधित संशयित दहशतवाद्यांना फुलवारी शरीफ परिसरातून अटक करण्यात आली आहे. मोहम्मद जल्लालुद्दीन आणि अतहर परवेज असे या व्यक्तींची नावे आहेत. यापैकी मोहम्मद जल्लालुद्दीन हा झारखंड पोलीसमधील सेवानिवृत्त अधिकारी आहे. तर अतहर परवेज हा दहशतवादी कारवायामुळे बंदी घालण्यात आलेल्या सिमी या संघटनेचा सदस्य होता. सिमीवर बंदी घालण्यात आल्यानंतर अतहर परवेज याने पीएफआय पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियासाठी काम सुरू केले. तो सध्या पीएफआयची राजकीय विंग असलेल्या ‘SDPI’सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियासाठी काम करत होता, अशी माहिती मनिष कुमार यांनी दिली आहे.
Accused incl a retired police officer of Jharkhand, Mohd Jallauddin along with a former member of SIMI who is also current member of PFI&SDPI, Athar Parvez arrested. Parvez’s younger brother went to jail in 2001-02 bomb blasts in state after SIMI was banned:Bihar SSP Manish Kumar pic.twitter.com/3y5vBlwJiI
— ANI (@ANI) July 13, 2022
तरुणांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण
अधिक माहिती देताना मनिष कुमार यांनी सांगितले की अटक करण्यात आलेले व्यक्ती हे फुलवारी शरीफ परिसरातील नवीन टोला अहमद पॅलेसमध्ये मार्शल आर्ट प्रशिक्षणाचे शिबिर चालवायचे. मात्र प्रत्यक्षात या शिबिराच्या आडून ते एका विशिष्ट समाजातील लोकांना दहशतवादी कारवायांचे तसेच शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देत होते. त्यांच्या शिबिरामध्ये परराज्यातील तरुण देखील येऊ लागले होते. मात्र हे तरुण हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबण्यासाठी आपली खरी ओळख देत नव्हते असं मनिष कुमार यांनी म्हटलं आहे. या प्रकरणाचा आणखी तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.