दक्षिणेतील हे राज्य भारतापासून तोडण्याचा डाव; राज्यपालांच्या वक्तव्याने देशभर खळबळ, कुणावर केला गंभीर आरोप?

Governor R N Ravi : भाजपमुक्त राज्य करण्याच्या नादात काही राज्य भारत मुक्त होण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. काही राजकीय मंडळी ही राज्य देशापासून तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा थेट आरोपच राज्यपालांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी पण दक्षिण भारतात असे प्रयोग झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

दक्षिणेतील हे राज्य भारतापासून तोडण्याचा डाव; राज्यपालांच्या वक्तव्याने देशभर खळबळ, कुणावर केला गंभीर आरोप?
हे राज्य भारतापासून तोडण्याचा डाव, राज्यपालांचा गंभीर आरोप काय?
Follow us
| Updated on: Oct 19, 2024 | 10:01 AM

राज्यपाल आर एन रवी यांच्या वक्तव्याने तामिळनाडूतच नाही तर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. तामिळनाडूला भारतापासून तोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तीन भाषांच्या सूत्राला तामिळनाडुने विरोध केला आहे. तर देशातील इतर 27 राज्यांनी हे सूत्र स्वीकारले आहे. त्याचवेळी राज्यपालांच्या या विधानाने आरोप-प्रत्यारोपाचा फैरी झाडल्या जात आहे. अर्थात राज्यपालांचा रोख कुणाकडे आहे आणि का आहे हे वेगळं सांगायला नको.

राज्यपालांनी टोचले राज्य सरकारचे कान

राज्यपाल आर. एन. रवी यांनी शुक्रवारी हे स्फोटक वक्तव्य केले. हिंदी महिना साजरा करण्याच्या कार्यक्रमाच्या समारोपावेळी त्यांनी राजकीय पक्षांवर कठोर शब्दात टीका केली. हिंदी लादण्यात येत असल्याचा ते केवळ बहाणा, ढोंग करत आहे. त्यांना भाषेच्या विरोधा आडून संवाद तोडायचा आहे. त्यांची अत्यंत जहाल आणि विषारी धोरण आहे. त्यांना भारतापासून तामिळनाडू राज्याला तोडायचे आहे. पण या कामात त्यांना मिळणार नाही, असे त्यांनी फटकारले.

हे सुद्धा वाचा

भारताचे तुकडे करता येणार नाही

तामिळनाडूला देशापासून तोडण्याचे षडयंत्र रचण्यात येत आहे. हे राज्य स्वतंत्र करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. पण असे मनसुबे रचणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की भारताचे तुकडे करता येणार नाही, असे त्यांनी फटकारले. तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी शुक्रवारी दुरदर्शनच्या चेन्नई कार्यालयात हिंदी महिन्याचा समारोपीय कार्यक्रमात राज्य गीत ‘तमिल थाई वज़्थु’ ची एक ओळ राज्यपालांनी म्हटली नसल्याचा आरोप केला आहे.

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यात संघर्ष

गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात वाकयुद्ध रंगल्याचे दिसून येते. दोघांमध्ये संघर्ष विकोपाला गेला आहे. कार्यक्रमात राज्य गीत ‘तमिल थाई वज़्थु’ ची एक ओळ राज्यपालांनी म्हटली नसल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. राज्यपालांनी राष्ट्रीय एकतेचा अवमान केल्याचा आरोप स्टॅलिन यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी एक पाऊल पुढे जात, राज्यपालांवर वर्णद्वेषी असल्याचा आरोप केला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.