PM Kisan : लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 7वा हप्ता लवकरच

शेतकऱ्याचं आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झालं आहे त्यांच्या खात्यात मार्च पर्यंत ही रक्कम ट्रान्सफर केली जाणार आहे.

PM Kisan : लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 7वा हप्ता लवकरच
पीएम किसान सन्मान निधी
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 3:01 PM

नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाते. या योजनेची 7वा हप्ता लाभधारक शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचला आहे. आता कृषी मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च 2021 पर्यंत 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येक 2 हजार रुपये ट्रान्सफर केले जाणार आहेत. आतापर्यंत 9 कोटी 41 लाख 90 हजार 188 शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपयांच्या सातवा हप्ता पोहोचला आहे. अजून 1.6 कोटी शेतकरी बाकी आहेत. त्यामुळे सरकारनं आता उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची तयारी चालवली आहे. ज्या शेतकऱ्याचं आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झालं आहे त्यांच्या खात्यात मार्च पर्यंत ही रक्कम ट्रान्सफर केली जाणार आहे.(7th installment of PM Shetkari Sanman Yojana will be credited to the farmers’ account soon)

दरम्यान, शेतकऱ्यांनी आपण कुठली चुकीची माहिती तर दिली नाही ना याची पडताळणी करायला हवी. फार्मर कॉर्नरवर क्लिक केल्यानंतर Benificary status वर क्लिक करा. त्यानंतर तिथं आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि फोन नंबर हे पर्याय दिसतील. तिथे आपण योग्य माहिती दिली आहे की नाही याची पाहणी करु शकतो. जर चुकीची माहिती दिली असेल तर ती आपण दुरुस्त करु शकतो. जर तुमचा अर्ज एखाद्या कागदपत्राविना अडकला असेल तर तुम्ही ती कागदपत्रही जोडू शकणार आहात.

काय आहे ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजना?

>> प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता 25 डिसेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षभरात 3 हप्त्यात 6 हजार रुपये दिले जातात.

>> पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यात 6 हजार रुपये जमा करतं. त्यातील पहिला हप्ता हा 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान जमा केला जातो. दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै आणि तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो.

>> सर्व कागदपत्र योग्य असतील तर सर्व 11.17 कोटी रजिस्टर्ड शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याचाही लाभ मिळणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी दिलेली माहिती पडताळून पाहावी आणि चूक असल्यास ती दुरुस्त करावी असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.

योजनेतील तुमचं नाव कसं पाहाल?

>> पीएम किसान सन्मान योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्ही अर्ज केला असेल आणि लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव तपासायचं असल्यास सरकारनं ही सुविधा आता ऑनलाईन पद्धतीनं दिली आहे.

>> सरकारची वेबसाईट pmkisan.gov.in वर तुम्ही तुमचं नाव तपासू शकता. वेबसाईट ओपन झाल्यानंतर त्यातील मेन्यूमध्ये फार्मर कॉर्नरवर जाऊन लाभार्थी यादीवर क्लिक करा.

>> आपलं राज्य, जिल्हा, उप-जिल्हा, ब्लॉक आणि गावाचं विवरण पाहा. त्यानंतर आपल्याला Get Report वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळेल.

PM Kisan हेल्पलाईवर सर्व माहिती

पीएम किसान हेल्पलाइन नंबर:155261 पीएम किसान टोल फ्री नंबर: 18001155266 पीएम किसान लैंडलाइन नंबर: 011—23381092, 23382401 पीएम किसान की एक और हेल्पलाइन है: 0120-6025109 ई-मेल आईडी: pmkisan-ict@gov.in

संबंधित बातम्या : 

योजनेची गरज नसणाऱ्या 20 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचे पैसे, कृषी मंत्रालयाची माहिती

पीएम किसान सन्मान योजनेचा अपात्र शेतकऱ्यांना लाभ; सरकारकडून पैसे परत घेण्याची मोहीम

7th installment of PM Shetkari Sanman Yojana will be credited to the farmers’ account soon

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.