नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना आणि केसीसी स्कीमला लिंक केल्यानंतर देशातील 1.5 कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात आलं आहे. त्यांची खर्चाची मर्यादा 1.35 लाख कोटी रुपये आहे. 24 फेब्रुवारी 2020 पासून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या लाभार्थ्यांना केसीसी देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली होती. मोदी सरकारनं 2 लाख कोटी रुपये खर्चाची मर्यादा असलेले अडीच कोटी क्रेडिट कार्य जारी करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अजून 1 कोटी लाभार्थ्यांना केसीसी मिळणार आहे. सरकार पीएम शेतकरी आणि केसीसी लाभार्थ्यांचा गॅप भरु इच्छित आहे. त्यासाठी पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी केसीसी घेणं सोपं केलं आहे. या योजनेत नोंदणीकृत शेतकऱ्यांचं बायोमेट्रिक झालं आहे. त्यांची शेती, बँक आणि आधारचे रेकॉर्ड व्हेरिफाय करण्यासाठी बँक त्यांना केसीसी देण्यात आडकाठी आणू शकत नाही.(The government will provide free Kisan credit cards to 1 crore farmers)
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेनुसार देशातील 11.45 कोटी शेतकरी आधार कार्ड, रेव्हेन्यू रेकॉर्ड आणि बँक अकाऊंट नंबरचा डेटाबेस केंद्र सरकारला मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे, त्यांना या रेकॉर्डला केंद्रीय कृषी मंत्रालया सुरुवातीलाच मान्यता दिली आहे.
बँक त्यासाठी शेतकऱ्यांना तंग करु शकत नाही. शेतकरी बँकांना सांगू शकतो की, त्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा लाभ मिळत आहे आणि त्यांचा प्रत्येक रेकॉर्ड केंद्र आणि राज्य सरकारकडून व्हेरिफाय झाला आहे.
पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेला केसीसी योजनेला जोडल्यानंतर केवायसीचा मुद्दाही संपला आहे. आता शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी फक्त एक पानी अर्ज भरावा लागणार आहे. हा अर्ज pmkisan.gov.inवर जाऊन डाऊनलोड करावा लागेल. तिथे डाऊनलोड केसीसी फॉर्म हा पर्यायही देण्यात आला आहे. तो फॉर्म तुम्हाला भरुन द्यावा लागणार आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाते. या योजनेची 7वा हप्ता लाभधारक शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचला आहे. आता कृषी मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च 2021 पर्यंत 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येक 2 हजार रुपये ट्रान्सफर केले जाणार आहेत. आतापर्यंत 9 कोटी 41 लाख 90 हजार 188 शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपयांच्या सातवा हप्ता पोहोचला आहे. अजून 1.6 कोटी शेतकरी बाकी आहेत. त्यामुळे सरकारनं आता उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची तयारी चालवली आहे. ज्या शेतकऱ्याचं आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झालं आहे त्यांच्या खात्यात मार्च पर्यंत ही रक्कम ट्रान्सफर केली जाणार आहे.
संबंधित बातम्या :
कोरोना काळात शेतीनं दिली साथ, यंदाच्या Budget मध्ये मिळणार का शेतकऱ्यांना दिलासा?
The government will provide free Kisan credit cards to 1 crore farmers