PM Narendra Modi Speech : विकसीत भारतासाठी कोणता प्लॅन? पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरुन सांगितली ही लाखमोलाची गोष्ट

PM Modi 78th Independence Day Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील स्वातंत्र्य दिनाचे भाषण लक्षवेधी ठरले. त्यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. पंतप्रधानांना सलग 11 व्या वेळा ध्वजारोहण केले. विकसीत भारताबद्दल त्यांनी हा प्लॅन सांगितला..

PM Narendra Modi Speech : विकसीत भारतासाठी कोणता प्लॅन? पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरुन सांगितली ही लाखमोलाची गोष्ट
विकसीत भारतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हुंकार
Follow us
| Updated on: Aug 15, 2024 | 9:24 AM

देशाच्या अर्थव्यवस्थेने गेल्या दहा वर्षांत मोठी उंची गाठली. अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील स्वातंत्र्य दिनी केलेले भाषण लक्षवेधी ठरले. आज देशभर स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला विकसीत करण्यासाठीचा प्लॅन सांगितला. त्यांनी देशभरातून विकसीत भारतासाठी काय काय सूचना आल्या, लोकांनी काय अपेक्षा व्यक्त केल्या. काय मतं मांडलीत याची माहिती दिली.

हे केवळ भाषणाचे शब्द नाहीत

विकसीत भारत-2047 हे केवळ भाषणाचे शब्द नाहीत. त्यामागे परिश्रम आहेत. देशातील लाखो लोकांनी विकसीत भारताविषयीचे काय स्वप्न आहे, त्यांची मते जाणून घेण्यात येत आहेत. मला हे सांगताना आनंद होत आहे की, विकसीत भारतासाठी कोट्यवधी देशवासीयांनी सूचना केल्या. त्यांची अमूल्य मते मांडली. आपल्या देशातील जनतेची विचार शक्ती मोठी आहे. त्यांची स्वप्न मोठी आहेत. त्यांच्या विचारातून विकसीत राष्ट्राची संकल्पना समोर येते. तेव्हा आमचा संकल्प आणखी दृढ होतो. आमच्या मनातील आत्मविश्वास नवीन उंचीवर पोहचतो, असे पंतप्रधान म्हणाले.

हे सुद्धा वाचा

कोणी-कोणी केल्या सूचना

पंतप्रधानांनी देशातील कोट्यवधी जनतेला धन्यवाद दिले. या सूचनांमुळे देशावासियांच्या स्वप्नातील भारत प्रतिबिंबित झाला. या अभियानात तरुण, ज्येष्ठ नागरिक, गाव, शहरातील जनता, गरीब, शेतकरी, आदिवासी, श्रीमंत या सर्व वर्गातील लोकांनी विकसीत भारत कसा असावा याचे संकल्प चित्र सादर केले. त्यांनी अनेक अमूल्य विचार, सल्ला दिला. या सूचना विकसीत भारतासाठी इंधन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विकसीत भारतासाठी कुणाचे काय प्लॅन?

देशातील विविध वर्गातील नागरिकांनी विकसीत भारतासाठी काही सूचना केल्या. त्यामध्ये त्यांनी अनेक मोठी स्वप्न पाहिली आहेत. यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांची अमुलाग्र योजनेची वकील करण्यात आली आहे. काहींनी न्यायपालिकेतील प्रलंबित प्रकरणावर चिंता व्यक्त केली आणि जलद न्याय देण्यासाठी योजनेचा प्रस्ताव मांडली. पर्यावरण तज्ज्ञांनी देशात आता ग्रीन फील्ड सिटीचा आग्रह धरला. काहींना अंतराळात भारताच्या स्पेस स्टेशनची योजना मांडली. काहींनी योग, आयुर्वेद, पारंपारिक औषधी, आजीबाईच्या बटव्यातील औषधींसाठी योजना मांडली. काही भारतीयांनी मीडिया ग्लोबल करण्यावर भर दिला. विकसीत भारतासाठी तरुणांना कौशल्य विकासासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्याची सूचना केली.

Vocal for Local हा मंत्र पंतप्रधानांनी पुन्हा दिला. या एका विचारामुळे भारतीय अर्थव्यवस्थेने जोम पकडला आहे. प्रत्येक जिल्हा आता स्वतःवर अभिमान करु लागला आहे. एक जिल्हा, एक उत्पादन यामुळे त्यांच्यात उत्साह संचारला आहे. त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे, असे पंतप्रधानांनी आवर्जून अधोरेखित केले.

'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.