CAA : नागरिकत्त्व सुधारणा कायदा नेमका काय? पाकिस्तानसह ‘या’ देशातील लोकांना मिळणार भारताचं नागरिकत्त्व

What is the CAA rule in India : आगामी लोकसभा निवडणूकीआधी सत्ताधारी भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या पाच वर्षांआधी संसदेत मंजूर केलेला कायदा लागू केला आहे. नेमका काय आहे हा कायदा? विरोधक का करत या कायद्याला विरोध? जाणून घ्या.

CAA : नागरिकत्त्व सुधारणा कायदा नेमका काय? पाकिस्तानसह 'या' देशातील लोकांना मिळणार भारताचं नागरिकत्त्व
What is the CAA rule in India?
Follow us
| Updated on: Mar 11, 2024 | 7:39 PM

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केलीये. सीएए कायदा हा देशभरामध्ये लागू करण्यात आला आहे. हा कायदा पाच वर्षांआधी संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आता पाच वर्षांनी या कायद्याची अंमलबजावणी झाली आहे. या कायद्याला विरोधकांनी कडाडून विरोध केलेला. परंतु सीएए म्हणजे नागरिकत्त्व सुधारणा कायदा नेमका काय आहे आणि विरोधक का विरोध करत आहेत जाणून घ्या.

(Citizenship Amendment Act) सीएए कायद्याचा अर्थ?

CAA म्हणजे नागरिकत्त्व सुधारणा कायदा होय. या कायद्यामध्ये तीन देशातील अल्पसंख्यांकांना भारतीय नागरिकत्त्व देण्याची तरतूद आहे. पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान अशा तीन देशांचा यामध्ये समावेश आहे.  धार्मिक छळामुळे  पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून पळ काढलेल्या देशातील अल्पसंख्यांकांना नागरिकत्त्व देण्यात येणार आहे.

सहा धार्मिक अल्पसंख्यांकांना नागरिकत्त्व

नागरिकत्त्व सुधारणा कायद्यामध्ये हिंदू, बौद्ध, जैन, पारशी ख्रिश्चन आणि शीख या सहा धार्मिक अल्पसंख्यांकांना नागरिकत्त्व देण्याचा प्रयत्न आहे. याआधी भारताचं नागरिकत्त्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतामध्ये किमान 11 वर्षे राहणं आवश्यक होतं. पण नागरिकत्त्व सुधारणा विधेयकामुळे आता ही अट शिथिल करण्यात आली आहे. या कायद्यानुसार आता 6 वर्षे इतकी अट करण्यात आली आहे.

CAA कायद्याला विरोधकांचा का आहे विरोध?

या कायद्यानुसार  पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशातील अल्पसंख्यांकांना नागरिकत्त्व  मिळणार आहे. यामध्ये  हिंदू, बौद्ध, जैन, पारशी ख्रिश्चन आणि शीख या धार्मिक अल्पसंख्यांकांया समावेश आहे. मात्र मुस्लिम धर्माचा यामध्ये समावेश नसल्याने विरोधकांकडून या कायद्याला विरोध केला जात आहे.  काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांनी या कायद्याला कडाडूव विरोध केला आहे. मुस्लिम समाजाच्या विरोधात हा कायदा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, नागरिकत्त्व सुधारणा कायदा लागू केल्यावर आता संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी  संबोधित करणार असल्याची माहिती समजत आहेत. मोदी काय बोलणार आहेत याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.