PM मोदी यांनी अमेरिकन गुप्तहेर विभागाच्या संचालक तुलसी यांना ‘गंगाजल’ भेट दिले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेच्या गुप्तहेर विभागाच्या प्रमुख तुलसी गॅबार्ड यांची भेट घेतली.यावेळी त्यांनी प्रयागराज येथील महाकुंभमधून आलेले गंगाजल त्यांना भेट दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेच्या गुप्तहेर विभागाच्या प्रमुख तुलसी गॅबार्ड यांची भेट घेतली. त्यांनी या भेटीवेळी तुलसी गॅबार्ड यांना प्रयागराज येथून आणलेले पवित्र गंगाजल भेट दिले. महाकुंभ २०२५ चे आयोजन यंदा प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर झाले होते.नुकतिच २६ फेब्रुवारी रोजी या महाकुंभ मेलाची समाप्ती झाली आहे. या धार्मिक मेळाव्यात ६६ कोटीहून अधिक श्रद्धाळू आणि पर्यटकांनी भेट दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यापूर्वी तुलसी गॅबार्ड यांनी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. राजधानी दिल्लीत आयोजित बैठकीत बंदी घातलेली खलिस्तानी संघटना शिख फॉर जस्टीस ( एसएफजे) या संघटनेने अमेरिकेत भारत विरोधी कारवाया केल्या जात असल्या संदर्भात बोलणी झाली.
श्रीमद्भगवत गीतेतून मिळते मार्गदर्शन- तुलसी
नेहमी आनंदाच्या आणि संकटाच्या घडीत दोन्ही वेळी श्रीमद्भगवत गीतेतून भगवान कृष्ण यांनी दिलेल्या संदेशातून शक्ती आणि मार्गदर्शन मिळते असे यावेळी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना हिंदू धर्माला मानणाऱ्या तुलसी गॅबार्ड यांनी सांगितले.




भारत-अमेरिका संबंधाच्या समर्थक
तुलसी गॅबार्ड या रविवार सकाळी नवी दिल्लीत पोहचल्या. गुप्तचर सहकार्य, सायबर सुरक्षा आणि संरक्षण संबंधांवर भारतीय अधिकाऱ्यांशी त्यांनी बोलणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा झाल्यानंतर त्यांनी भारतात येऊन पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आहे. तुलसी गॅबार्ड भारत आणि अमेरिकन संबंधांच्या समर्थक म्हणून मानले जाते.
या आपल्या दौऱ्यादरम्यान तुलसी गॅबार्ड यांनी द्विपक्षीय सुरक्षा सहकार्य वाढविण्यासंदर्भात झालेल्या बैठका आणि परिषदात सहभाग घेतला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका परिषदेत सुमारे २० देशांचे गुप्तचर आणि सुरक्षा अधिकाऱ्यांच्या बैठकीला त्या हजर राहील्या. राष्ट्रीय सुरक्षा परिषद, सचिवालयाद्वारा हा कार्यक्रम आयोजित केला होता.
तुलसी गॅबार्ड यांचा दूसरा परदेश दौरा
अमेरिकेच्या गुप्तहेर विभागाच्या प्रमुख झाल्यानंतर तुलसी गॅबार्ड यांची ही दूसरी आंतरराष्ट्रीय दौरा आहे. याआधी त्यांनी जर्मनीत म्युनिच सुरक्षा परिषदेत सहभाग घेतला होता.
कोण आहेत तुलसी गॅबार्ड ?
तुलसी गॅबार्ड या भारतीय वंशाच्या नाहीत.त्याच्या आईने हिंदू धर्म स्वीकारला आहे. तर वडील ख्रिस्तीच आहेत. त्यांच्या आईने तुलसी यांच्या सह पाच मुलांची नावे हिंदू पद्धतीची ठेवली आहेत.