पंतप्रधान मोदी ध्यान धारणेसाठी गरुडचट्टीवर, 34 वर्षांपूर्वीही याच ठिकाणी तपस्या
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ यात्रेसाठी गेले आहेत. केदारनाथ येथे पूजा केल्यानंतर ते छत्री आणि छडी घेऊन पायी गरुडचट्टीसाठी रवाना झाले. त्यांच्यासोबत चोख सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली. मोदींनी याआधी बोलताना अनेकदा गरुडचट्टीचा उल्लेख केला होता. केदारनाथ येथे 16 जून 2013 रोजी आलेल्या भीषण पुरात केदारनाथ आणि गरुडचट्टीला जोडणारा […]
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ यात्रेसाठी गेले आहेत. केदारनाथ येथे पूजा केल्यानंतर ते छत्री आणि छडी घेऊन पायी गरुडचट्टीसाठी रवाना झाले. त्यांच्यासोबत चोख सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली. मोदींनी याआधी बोलताना अनेकदा गरुडचट्टीचा उल्लेख केला होता.
केदारनाथ येथे 16 जून 2013 रोजी आलेल्या भीषण पुरात केदारनाथ आणि गरुडचट्टीला जोडणारा रस्ता उद्ध्वस्त झाला होता. त्यानंतर दुरुस्ती काम करुन या मार्गावर पायी रस्ता तयार करण्यात आला. सध्या रामबाडा येथून दूसऱ्या डोंगरावरुन लिनचोलीमार्गे केदारनाथला जाणारा नवा पायी मार्ग बनवण्यात आला आहे. केदारनाथ यात्रेत गरुडचट्टीचे विशेष धार्मिक महत्व आहे. हे ठिकाण आध्यात्म आणि ध्यान धारणेसाठी प्रसिद्ध आहे. मानसिक शांतीसाठी अनेक दशकांपासून शेकडो साधु संत या ठिकाण येतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याआधी अनेकदा या गरुडचट्टीचा उल्लेख अनेकदा केलेला आहे. मोदी 1985 ते 1990 दरम्यानच्या 5 वर्षात गरुडचट्टीमध्ये संन्याशाप्रमाणे राहिल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तेव्हा ते रोज केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शनासह जलाभिषेकही करायचे, असेही सांगितले जाते. मागील वर्षी 3 मे आणि 20 ऑक्टोबर रोजी केदारनाथला पोहचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी येथे घालवलेल्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला होता.
पंतप्रधान मोदींनी त्यावेळी गरुडचट्टीसाठी रस्ता बनवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर मुख्य सचिव उत्पल कुमार यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने या कामाची पाहणी केली होती.