बालीत फ्रान्स-इटलीच्या नेत्यांना पीएम मोदी भेटले, राष्ट्रपती मॅक्रो म्हणाले, शांतीसाठी आमचा समान अजेंडा
बैठकीनंतर पंतप्रधान कार्यालयानं सांगितलं की, पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रो यांनी याबाबत बातचित केली.
इंडोनेशियातील बाली शहरात जी-२० शिखर संमेलन आयोजित करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या दिवशी जागतिक नेत्यांना भेटले. पंतप्रधान मोदी यांनी आज बुधवारी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुअल मॅक्रो, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी याशिवाय ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी भेटीदरम्यान सुरक्षा, परमाणू ऊर्जा, व्यापार तसेच अन्न सुरक्षेच्या क्षेत्रात सहकार्य करण्यावर जोर दिला. राष्ट्रपती मॅक्रो यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी भेटीनंतर जगात शांततेसाठी आमचा अजेंडा सारखा असल्याचं म्हटलं.
बैठकीनंतर पंतप्रधान कार्यालयानं सांगितलं की, पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रो यांनी याबाबत बातचित केली. दोन्ही देशांत सुरक्षा संबंध, टिकाऊ विकास आणि आर्थिक सहकार्य वाढविलं जाईल. मोदी आणि मॅक्रो यांनी कित्तेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली.
संमेलनात झालेल्या बैठकीनंतर मोदी यांनी सांगितलं की, भारत आणि फ्रान्स जवळचे संबंध चांगल्यासाठीचं आहेत. या भेटीत युक्रेन संबंध आणि अन्न व ऊर्जा सुरक्षा यासह अन्य विषयांवर चर्चा झाली.
मोदी यांनी ट्वीट केलंय. त्यात ते म्हणतात, इमॅनुअल मॅक्रोसोबत चांगली बातचित झाली. दोन्ही देशांचा सारखा अजेंडे असल्याचं सांगितलं. जी २० च्या भारताच्या अध्यक्षतेसाठी फ्रान्स काम करणार असल्याचं सांगण्यात आलं.
विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अरींदम बागची यांनी सांगितलं की, मोदी आणि मॅक्रो यांनी सुरक्षा, परमाणू ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक क्षेत्रातील नव्या नियमांसाठी परीक्षण केले जाईल.
पंतप्रधान मोदी काल मंगळवारी बालीत अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन आणि इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना भेटले होते. गेल्या महिन्यात सुनक पंतप्रधान बनल्यानंतर दोघांमध्ये समोरासमोर झालेली ही पहिली मुलाखात होती. याशिवाय पंतप्रधान मोदी यांनी सेलेगलचे राष्ट्रपती आणि आफ्रिकी संघाचे अध्यक्ष मॅकी साल यांच्याशी चर्चा केली. याशिवाय नेदरलँड राष्ट्रपती मार्क रूट यांनाही भेटले.