तौत्के चक्रीवादळ : पंतप्रधान मोदींनी उच्चस्तरीय बैठकीत घेतला तयारीचा आढावा; एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्करासह सर्व यंत्रणा सज्ज
कोरोना रुग्णांच्या उपचाराला चक्रीवादळाचा कुठलाही फटका बसू नये, यादृष्टीने पूरेपूर खबरदारी घेण्याच्या सूचना पंतप्रधानांनी केल्या. (PM Modi reviews preparations at high-level meeting on Tauktae Cyclone)
नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोनाची चिंता कायम असतानाच तौत्के चक्रीवादळाने धडकी भरवली आहे. किनारपट्टीलगतच्या अनेक राज्यांना या चक्रीवादळाचा धोका असल्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. त्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली असून चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विविध यंत्रणांनी कितपत तयारी केली आहे, याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी आज उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अधिक सतर्कतेच्या सूचना दिल्या. चक्रीवादळाचा फटका बसणाऱ्या भागांतील नागरिकांना वेळीच सुरक्षितस्थळी हलवण्याच्या दृष्टीकोनातून शक्य त्या सर्व उपाययोजना राबवा, अशा सूचना पंतप्रधानांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच रुग्णालयांमध्ये कोविड व्यवस्थापन, वॅक्सिन कोल्ड चेन, पॉवर बँक अॅप आणि चक्रीवादळाच्या कारणावरून संवेदनशील ठिकाणांवर आवश्यक औषधांचा साठा करण्यासाठी विशेष तयारी करण्याचेही निर्देश दिले आहेत. (PM Modi reviews preparations at high-level meeting on Tauktae Cyclone)
पंतप्रधान मोदींनी घेतला आढावा
चक्रीवादळाचा मुकाबला करण्यासाठी संबंधित राज्ये आणि केंद्रीय मंत्रालये तसेच विविध यंत्रणांनी केलेल्या तयारीचा पंतप्रधान मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीतून आढावा घेतला. बैठकीत भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (आयएमडी) वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहिले होते. तौत्के चक्रीवादळ 18 मेच्या दुपारी किंवा सायंकाळच्या सुमारास पोरबंदर आणि नलिया यादरम्यान गुजरात किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या वादळाच्या वाऱ्याची गती ताशी 175 किमी इतकी भयंकर असणार आहे. चक्रीवादळामुळे गुजरातच्या किनारपट्टी भागातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामानशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना बैठकीत दिली.
या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता
जुनागढ आणि गिरी सोमनाथात मुसळधार पाऊस पडेल. तसेच सौराष्ट्र कच्छ व दिव या जिल्ह्यांतील गिर सोमनाथ, दिव, जुनागढ, पोरबंदर, देवभूमी द्वारका, अमरेली, राजकोट, जामनगर आदी परिसरात जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे. मोरबी, कच्छ, देवभूमी द्वारका आणि जामनगर जिल्ह्यांचा किनारपट्टी भाग आणि पोरबंदर, जुनागढ, दिव, गिर सोमनाथ, अमरेली आणि भावनगरमध्येही जोरदार पावसाची अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एनडीआरएफ, एसडीआरएफसह तिन्ही सैन्यदले सज्ज
चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी कॅबिनेट सचिव किनारपट्टी भागातील राज्यांचे मुख्य सचिव आणि संबंधित केंद्रीय मंत्रालये आणि यंत्रणांशी सतत संपर्कात आहेत. गृह मंत्रालयाकडून सातत्याने परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना एसडीआरएफ आधीच तैनात करण्यास सांगितले आहे. तसेच एनडीआरएफची 42 पथके तैनात असून 26 पथके स्टॅण्डबाय आहेत. या पथकांकडे सर्व परिस्थितीचा सामना करण्यासाठी पुरेशी सामग्री आहे. भारतीय तटरक्षक दलानेही सर्वतोपरी सज्जता ठेवली आहे. तटरक्षक दल आणि नौदलाने जहाजे आणि हेलिकॉप्टर तैनात ठेवली असून हवाई दल आणि इंजिनिअर टास्क फोर्सही बोटी तसेच इतर बचाव उपकरणांच्या सज्जतेने तैनात आहे. चक्रीवादळाचा वीज पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. परिणामी कोरोनाग्रस्तांच्या उपचारावर परिणाम होईल, या भितीने वीज मंत्रालयाने संबंधित यंत्रणेला वीजपुरवठा खंडित झाल्यास तत्काळ बिघाड दूर करून पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उच्च स्तरीय बैठकीत पंतप्रधान मोदींनी आरोग्य मंत्रालयाचा कंट्रोल रुम 24 तास सुरू ठेवण्याचेही निर्देश दिले आहेत. कोरोना रुग्णांच्या उपचाराला चक्रीवादळाचा कुठलाही फटका बसू नये, यादृष्टीने पूरेपूर खबरदारी घेण्याच्या सूचना पंतप्रधानांनी केल्या. बैठकीला गृह मंत्री, गृह राज्यमंत्री, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, राज्यांच्या गृह मंत्रालयांचे आणि विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. (PM Modi reviews preparations at high-level meeting on Tauktae Cyclone)
जालन्यात कोरोनाचे हॉटस्पॉट होणारे परिसर सील होणार; राजेश टोपे यांचे आदेशhttps://t.co/S2MtkP0zvf#RajeshTope #HealthMinisterRajeshTope #Maharashtra #Jalna #JalnaCorona #CoronaUpdate
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 15, 2021
इतर बातम्या
BATA ची जबाबदारी आता गुंजन शाह यांच्या खांद्यावर; ब्रिटानियातही होते CCO
कल्याण-डोंबिवलीकर ऐकत नाही, लॉकाडाऊनच्या नियमांचं सर्रास उल्लंघन, हतबल प्रशासनाकडून कठोर निर्णय