PM Modi Kedarnath: हे दशक उत्तराखंडचं, 100 वर्षात आले नाहीत एवढे भाविक पुढच्या 10 वर्षात येतील : मोदी

| Updated on: Dec 24, 2021 | 3:22 PM

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री पुष्कर सिंह थामी, कॅबिनेट मंत्री हरक सिंह आणि सुबोध उनियाल यांनी तेथील परिस्थितीचा, विकासकामांचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाने केदार घाटीमध्ये सुरक्षा वाढवली आहे.

PM Modi Kedarnath: हे दशक उत्तराखंडचं, 100 वर्षात आले नाहीत एवढे भाविक पुढच्या 10 वर्षात येतील : मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शंकराचार्यांच्या पुतळ्याचं उद्घाटन
Follow us on

PM Modi Kedarnath: पंतप्रधान नरेंद्र मोदी पाचव्यांदा केदारनाथच्या दर्शनासाठी पोहोचले आहेत. त्यांच्या केदारनाथ दौऱ्यात ते पावणे चारशे कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यामध्ये सरस्वती आणि मंदाकिनी नद्यांच्या काठावर सुरक्षा भिंतीसह आदिगुरू शंकराचार्यांच्या समाधीचे उद्घाटन, मंदाकिनीवरील पूल आणि तीर्थक्षेत्रातील पुजार्‍यांसाठी निवासस्थाने, तसेच इतर अनेक पुनर्निर्माण कामांची पायाभरणी यांचा समावेश आहे. यासोबतच केदारनाथ धाममध्ये चार गुहाही तयार करण्यात आल्या आहेत. उत्तराखंड राज्य सरकारने या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी केली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 Nov 2021 11:27 AM (IST)

    कोरोनाविरोधात लढताना उत्तराखंडने अनुशासन दाखवलं : मोदी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोनाविरुद्धच्या लढाईत उत्तराखंडने दाखवलेली शिस्तही अतिशय प्रशंसनीय आहे. आज उत्तराखंडने भौगोलिक अडचणींवर मात केली आहे, उत्तराखंडच्या जनतेने 100 टक्के सिंगल डोसचे लक्ष्य गाठले आहे. ही उत्तराखंडची ताकद आहे.

  • 05 Nov 2021 11:21 AM (IST)

    हेमकुंड साहिबमध्ये रोपे-वे : मोदी

    पीएम मोदी म्हणाले की, येथून जवळच पवित्र हेमकुंड साहिब जी आहे. हेमकुंड साहिबचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी रोपवे तयार करण्याचीही तयारी सुरू आहे.


  • 05 Nov 2021 11:20 AM (IST)

    चार धाम महामार्गाला जोडणार : पंतप्रधान मोदी

    पीएम मोदी म्हणाले की, चारधाम रोड प्रकल्पावर वेगाने काम सुरू आहे, चार धाम महामार्गांना जोडत आहेत. भविष्यात केबल कारद्वारे केदारनाथपर्यंत भाविक याठिकाणी येऊ शकतील यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे.

  • 05 Nov 2021 11:10 AM (IST)

    सारसबागेत दिवाळी पाडव्यानिमित्त मोठी गर्दी

    पुणे

    सारसबागेत दिवाळी पाडव्यानिमित्त मोठी गर्दी

    सारसबागेतील तळ्यातल्या गणपतीच्या दर्शनासाठी पुणेकरांनी केली गर्दी

  • 05 Nov 2021 11:10 AM (IST)

    देवेंद्र फडणवीस त्रंबकेश्वरमध्ये दाखल, मंदिरात जाऊन घेतलं त्रंबकेश्वर महादेवाचे दर्शन

    नाशिक – देवेंद्र फडणवीस त्रंबकेश्वर मध्ये दाखल

    मंदिरात जाऊन घेतलं त्रंबकेश्वर महादेवाचे दर्शन

    सोबत केंद्रीय मंत्री भरती पवार उपस्थित

  • 05 Nov 2021 11:09 AM (IST)

    पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी घेतली पवारांची भेट

    पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी घेतली पवारांची भेट

    दिवाळीनिमित्त दिल्या शुभेच्छा

    पवारांचीही केली विचारपूस

  • 05 Nov 2021 10:34 AM (IST)

    कोट्यवधी भारतीयांचा आशीर्वाद, जवानांसोबत दिवाळी साजरी केली – मोदी

    कोट्यवधी भारतीयांचा आशीर्वाद मिळाला
    जवानांसोबत दिवाळी साजरी केली
    आज केदारनाथमध्ये देवाच्या चरणी लीन व्हायला आलोय

  • 05 Nov 2021 10:31 AM (IST)

    पंतप्रधान मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन

  • 05 Nov 2021 10:28 AM (IST)

    शंकराचार्यांच्या समाधीचं उद्घाटन करणं माझं कर्तव्य- मोदी

    शंकराचार्यांच्या समाधीचं उद्घाटन करणं माझं कर्तव्य
    भारताला महान ऋषींची परंपरा
    देशाच्या कानाकोपऱ्यात महान संतांची परंपरा

    • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • 05 Nov 2021 10:28 AM (IST)

    कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आर्यन खान, मुनमुन धामेचा, अर्बाज मर्चंट हाजेरीसाठी येणार असल्याची माहिती

    – आज कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आर्यन खान, मुनमुन धामेचा, अर्बाज मर्चंट हाजेरीसाठी येणार असल्याची माहिती

    – दर शुक्रवारी या तिघांना एनसीबी आॅफिसमध्ये हजेरी लावण्याचे कोर्टाचे आदेश…

    – एनसीबीने या तिघांना दिलीये ११ ते ३ ची वेळ…

    – आर्यन खान हा अलीबागला फार्महाऊसला असल्याची माहीती आहे, तो तिथून इथे येणार किंवा वकिलांना पाठवण्याची शक्यता…

  • 05 Nov 2021 10:26 AM (IST)

    केदारनाथमधील आदि शंकराचार्य समाधीचे उद्घाटन

  • 05 Nov 2021 09:46 AM (IST)

    गोविंदबागेतल्या दिवाळी कार्यक्रमाला अजितदादांची दांडी, पवार म्हणाले, त्यांना कोरोनाची भीती

    शरद पवार –

    लोकांच्या आग्रहास्तव आजचा कार्यक्रम

    सर्व नियमांचे पालन करत दिवाळी भेट कार्यक्रम

    सर्व खबरदारी घेवून हजारो नागरीकांनी शुभेच्छा दिल्या

    संकटातून बाहेर पडल्यानंतर नियमीत कामे होतील

    दोन वर्षात जे नुकसान झालं ते भरुन काढू

    समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था पूर्ववत उभी करु..

    कोरोनाची लक्षणे दिसलीत, अद्याप अहवाल नाही.. त्यामुळे अजित पवार गैरहजर..

    दोन चालक आणि तीन कर्मचारी पॉझिटिव्ह आलेत..

     

  • 05 Nov 2021 09:32 AM (IST)

    शंकराचार्यांच्या पुतळ्याचं मोदींकडून अनावरण

  • 05 Nov 2021 09:18 AM (IST)

    केदारनाथमध्ये मोदी

  • 05 Nov 2021 09:15 AM (IST)

    पूजा-अर्चा-आरती, केदारनाथाच्या चरणी मोदी लीन

  • 05 Nov 2021 09:14 AM (IST)

    केदारनाथ मंदिरात मोदींची पूजा अर्चा

  • 05 Nov 2021 09:03 AM (IST)

    मोदींच्या हस्ते शंकराचार्यांच्या पुतळ्याचं अनावरण

    पंतप्रधान मोदी आज आदिगुरू शंकराचार्यांच्या प्रतिमेचे अनावरणही करणार आहेत. केदारनाथमध्ये आदिगुरू शंकराचार्यांच्या पुतळ्याचे काम 2019 मध्ये सुरु झाले. ही मूर्ती 12 फूट उंच आणि 35 टन वजनाची आहे.