पंतप्रधान मोदींचे देशवासियांना न्यू इयर गिफ्ट; शहरी गरिबांना स्वस्तात घरे मिळणार

नव्या वर्षात पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेली ही पहिली योजना आहे. | PM Narendra Modi

पंतप्रधान मोदींचे देशवासियांना न्यू इयर गिफ्ट; शहरी गरिबांना स्वस्तात घरे मिळणार
Follow us
| Updated on: Jan 01, 2021 | 12:51 PM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 2022 पर्यंत देशातील बेघरांना पक्की घरे उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लाइट हाउस प्रोजेक्टचे (Light House Projects) उद्घाटन केले. नव्या वर्षात पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेली ही पहिली योजना आहे. (PM Narendra Modi at the launch of Light House Projects)

केंद्र सरकारच्या या योजनेमुळे शहरी भागांमध्ये नागरिकांना स्वस्तात घरे उपलब्ध होणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडून संयुक्तपणे ही योजना राबवण्यात येईल. लाइट हाउस प्रोजेक्टतंर्गत त्रिपुरा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड और तामिळनाडूत भूकंपविरोधी आणि पक्की घरे बांधली जातील.

मध्यमवर्गासाठी घरे उभारण्यासाठी देशाला नवे तंत्रज्ञान मिळाले आहे. लाइट हाउस प्रोजेक्ट देशातील घरबांधणी क्षेत्राला नवी दिशा दाखवणारे ठरतील. या प्रकल्पातंर्गत नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घरे तयार करण्यात येतील. ही घरे मजबूत आणि गरिबांसाठी आरामदायी असतील, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

कधीकाळी देशात निवास योजना हा सरकारसाठी प्राधान्याचा विषय नव्हता. मात्र, आता निवास योजना एखाद्या स्टार्टअप प्रमाणे काम करतील, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

काय आहे लाईट हाऊस प्रोजेक्ट?

केंद्र सरकारच्या लाईट हाऊस प्रोजेक्टसाठी त्रिपुरा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तमिलनाडू, आंध्र प्रदेश, झारखंड आणि गुजरात या राज्यांची निवड करण्यात आली आहे. हा केंद्रीय शहर मंत्रालयाचा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये स्थानिक जलवायू आणि पर्यावरणाचे संरक्षण करून पक्की घरे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत.

या प्रकल्पासाठी खास तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. घरांसाठीचे बीम कॉलम आणि पॅनल कारखान्यातून थेट घर बांधायच्या ठिकाणी आणले जातील. त्यामुळे घरबांधणीसाठी लागणाऱ्या खर्चात मोठी कपात होईल. तसेच ही घरे भूकंपरोधी असतील.

संबंधित बातम्या:

पत्र्यांऐवजी घरांवर सिमेंट स्लॅब, वीज पडून नुकसान टाळण्यासाठी लाइटनिंग अरेस्टर, कोकण उभं करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा प्लॅन

भारतात सर्वात महाग आणि स्वस्त घरं कोणत्या शहरात?

(PM Narendra Modi at the launch of Light House Projects)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.