काय हीरो, समजलं का ? जेव्हा एका बुजुर्ग महिलेकरिता कंडक्टरशी भांडले होते नरेंद्र मोदी
भाजपा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस विविध पद्धतीने साजरा करीत आहे. मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अनेक किस्से त्यांचे सहकारी शेअर करीत आहेत....
नवी दिल्ली | 17 सप्टेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी 73 वर्षांचे झाले. देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चाहते त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करीत आहेत. दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांना जगातील सर्वात लोकप्रिय नेता म्हणून पसंत केले जात असल्याचा सर्वे आला आहे. मॉर्निंग कंसल्टच्या सर्वेत पीएम मोदी यांना सर्वात जास्त रेटींग मिळाली आहे. 76 टक्के लोकांनी त्यांच्या नेतृत्वास मान्यता दिली आहे. नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातच्या वडनगर येथे झाला. वडनगर उत्तर गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील एक छोटे शहर आहे. दरवर्षी मोदी यांच्या जन्मदिनी त्यांच्या संबंधी किस्से आणि आठवणी त्यांचे चाहते सांगत असतात.
गुजरातचे आरएसएसचे कार्यकर्ते निताबेन सेवक यांनी मोदींचा एक रंजक किस्सा सांगितला आहे. त्यांनी मोदी यांचा बस कंडक्टरशी एका वृद्ध महिला प्रवाशासाठी झालेल्या वादाचा किस्सा सांगितला आहे. निताबेन म्हणतात, मोदी तेव्हा आमचे प्रचारक होते. 80 च्या दशकातील हा किस्सा आहे. आपण मोदींसोबत एका कार्यक्रमाला चाललो होतो. तेव्हा एक बुजुर्ग महिला बसमध्ये चढली. तिकीट काढताना समजले की ती चुकीच्या बसमध्ये चढली आहे. तिने कंडक्टरला बस थांबविण्याची विनंती केली. परंतू त्या कंडक्टरने बस न थांबवता उलट तिच्यावरच आरोप करायला सुरुवात केली.
काय हीरो, काही समजले का?
नरेंद्र मोदी हे सर्व पाहात होते. निताबेन यांनी सांगितले की या महिलेची अवस्था पाहून मोदी उठले आणि कंडक्टरशी भांडू लागले. ते तोपर्यंत त्याला बोलत राहिले जोपर्यंत त्याने बस थांबविली नाही. अखेर कंडक्टरने बस थांबिवली आणि त्यानंतर ती वृद्ध महिला गाडीतून उतरली. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पुन्हा कंडक्टरला उद्देश्यून म्हटले काय हीरो, काही समजले का? मला आशा आहे की मी जे तुला सांगितले ते नीट समजले असेल. अशी चुक पुन्हा व्हायला नको. असहाय लोकांचा सन्मान राखा. संघ प्रचारक ते देशाचे पंतप्रधान पदापर्यंत पोहचलेल्या मोदी यांचे अनेक किस्से आहेत.
जन्मदिवसाचे कार्यक्रम
भाजपा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस विविध पद्धतीने साजरा करीत आहे. त्रिपुरा भाजपाने या जन्मदिन सोहळ्यास ‘नमो विकास उत्सव’ असे नाव दिले आहे. गुजरात भाजपा गांधी जयंतीपर्यंत नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस साजरा करणार आहे. गुजरात भाजपा अध्यक्ष सी.आर.पाटील नवसारी जिल्ह्यात 30 हजार शाळकरी मुलींचे बॅंकेच अकाऊंट उघडणार आहेत. भाजपा युवा मोर्चाने रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.