PM Modi Jacket: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे नवं जॅकेट जोरदार चर्चेत! प्लास्टिकच्या बाटल्यांची पुनर्निर्मिती, कुणी दिली भेट?

प्लास्टिकच्या पुनर्वापरापासून तयार केलेल्या जॅकेटची रिटेल मार्केटमधील किंमत जवळपास 2 हजार रुपये एवढी असल्याचं सांगण्यात येतंय.

PM Modi Jacket: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे नवं जॅकेट जोरदार चर्चेत! प्लास्टिकच्या बाटल्यांची पुनर्निर्मिती, कुणी दिली भेट?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 08, 2023 | 2:07 PM

संदीप राजगोळकर, नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे त्यांचा वेश आणि वेगवेगळ्या जॅकेटमुळे (Modi Jacket) नेहमीच चर्चेत असतात. आजदेखील मोदींनी घातलेलं निळ्या रंगाचं जॅकेट चर्चेत आलंय. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) सध्या सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक विशेष प्रकारचं जॅकेट घालून संसदेत प्रवेश केला. मोदींनी घातलेल्या या निळ्या जॅकेटचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. याचं कारणही तसंच आहे. हे जॅकेट विशेष ब्रँड किंवा विशेष डिझायनरमुळे चर्चेत नाहीये. तर यासाठी वापरण्यात आलेला कपडा जास्त महत्त्वाचा आहे. तुम्ही-आम्ही ज्या प्लास्टिकच्या बाटल्या एका पाणी पिऊन फेकून देतो, त्याच प्लास्टिकपासून या जॅकेटचा कपडा तयार करण्यात आला आहे. इंडियन ऑइल कंपनीतर्फे नुकतंच हे जॅकेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्यात आलं.

पंतप्रधानांना मिळालेली विशेष भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी हे जॅकेट भेट म्हणून देण्यात आलं. बंगळुरू येथे इंडियन ऑइल कंपनीतर्फे एनर्जी वीक साजरा करण्यात येतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी या सप्ताहाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांना हे जॅकेट गिफ्ट करण्यात आलं. प्लास्टिकच्या एकदा वापरून फेकून देण्यात आलेल्या बाटल्यांपासून हे जॅकेट तयार करण्यात आलंय. याच कपड्यापासून आता इंडियन ऑइल कंपनीचे कर्मचारी तसेच सहायकांना युनिफॉर्म दिला जाणार आहे. पेट्रोल पंपावरील सहाय्यकांसाठी ही खास योजना कंपनीने आखली आहे.

पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने देशवासियांना एक सूचक संदेश देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे जॅकेट परिधान केल्याचं सांगण्यात येतंय.

कुणी तयार केलं जॅकेट?

तमिळनाडूतील श्री रेंगा पॉलीमर्स या कंपनीने इंडियन ऑइलला PET बॉटल्सपासून तयार केलेले ९ रंगाचे कपडे पुरवले होते. यापैकीच एका कपड्यापासून मोदी यांचं जॅकेट तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात आळा आहे. इंडियन ऑइल कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील टेलरकडून हे जॅकेट शिवून घेतले.

हे एक जॅकेट तयार करण्यासाठी साधारण १५ प्लास्टिक बाटल्यांपासून तयार केलेला कपडा लागल्याचं सांगण्यात येतंय. तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या एका संपूर्ण युनिफॉर्मसाठी २८ बाटल्यांचं कापड लागणार आहे.

पाण्याचा शून्य वापर

प्लास्टिक बाटल्यांपासून तयार होणार कपडा विशिष्ट शैलीत तयार करण्यात येतो.. इतर कॉटनच्या कपड्याला रंग देण्यासाठी पाण्याचा खूप वापर करावा लागतो. मात्र या कपड्याला रंग देण्यासाठी एक थेंबही पाणी लागत नाही. या कपड्यासाठी डोप डाइंगचा वापर केला जातो. बाटलीपासून आधी फायबर तयार केला जातो. त्यानंतर त्यापासून धागा काढला होता. याच धाग्यापासून फॅब्रिक तयार होते. नंतर या कपड्यापासून ड्रेस शिवले जातात.

प्लास्टिकच्या पुनर्वापरापासून तयार केलेल्या जॅकेटची रिटेल मार्केटमधील किंमत जवळपास 2 हजार रुपये एवढी असल्याचं सांगण्यात येतंय.

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.