मोदींच्या ‘हार्वर्डपेक्षा हार्डवर्क’ वक्तव्यावर टीकेची झोड, गुहा म्हणतात, मोदी स्वत:ला तज्ञांपेक्षा मोठं समजतात!

घरातील लाईट बंद करुन दिवे लावणे किंवा थाळ्या वाजवणे हा निव्वळ गवगवा आणि अंधश्रद्धेचा प्रकार होता. | PM Narendra Modi Ramachandra Guha

मोदींच्या 'हार्वर्डपेक्षा हार्डवर्क' वक्तव्यावर टीकेची झोड, गुहा म्हणतात, मोदी स्वत:ला तज्ञांपेक्षा मोठं समजतात!
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Apr 24, 2021 | 9:14 AM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षणाचं फारसं महत्त्व वाटत नाही. मी हार्वडपेक्षा हार्डवर्कला प्राधान्य देतो, हे त्यांचे वक्तव्य बरंच काही स्पष्ट करणार आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) कोणत्याही तज्ज्ञ व्यक्तींची गरज वाटत नाही. आपण तज्ज्ञांपेक्षा मोठे आहोत, असा त्यांचा आविर्भाव असतो. याचीच परिणती देशातील कोरोना परिस्थिती चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात होत असल्याचे वक्तव्य ज्येष्ठ इतिहासकार आणि राजकीय भाष्यकार रामचंद्र गुहा यांनी केले. (PM Narendra Modi Leadership Main Reason for COVID Mishandling says Ramchandra Guha)

‘द वायर’ या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत रामचंद्र गुहा यांनी यासंदर्भात सविस्तर भाष्य केले. यावेळी रामचंद्र गुहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना परिस्थिती हाताळण्यात का अपयशी ठरले, याची तीन प्रमुख कारणे सांगितली. एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तज्ज्ञ आणि त्यांच्या अनुभवी सल्ल्याचे वावडे आहे. मुळात पंतप्रधान मोदींना शिक्षणाचं फारसं महत्त्व वाटत नाही.

पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंप्रमाणे स्वत:मध्ये बदल घडवले पाहिजेत: रामचंद्र गुहा

पंतप्रधान मोदी स्वत:च मला तज्ज्ञांची गरज नाही, असे सांगतात. आपण तज्ज्ञांपेक्षा मोठे आहोत, असे मोदींना वाटते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला हवा तसा सल्ला देणाऱ्याच तज्ज्ञांचा सल्ला घेतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीतरी भव्यदिव्य आणि नाट्यमय करण्याचा सोस टाळून देशातील आघाडीच्या साथरोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार धोरण आखले असते तर भारतात कोरोनाचा प्रकोप बराच कमी असता, असे मतही रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केले. घरातील लाईट बंद करुन दिवे लावणे किंवा थाळ्या वाजवणे हा निव्वळ गवगवा आणि अंधश्रद्धेचा प्रकार असल्याची टीकाही यावेळी रामचंद्र गुहा यांनी केली.

‘कोरोना परिस्थितीच्या चुकीच्या हाताळणीसाठी मोदीच जबाबदार’

देशातील कोरोना परिस्थितीच्या चुकीच्या हाताळणीसाठी नरेंद्र मोदी यांचे नेतृत्त्व हे प्रमुख कारण जबाबदार आहे. पंतप्रधान मोदी यांनी केवळ फायद्याचा विचार करुन मंत्रिमंडळ तयार केले. सर्वोच्च न्यायालयासारख्या संस्थेतही स्वत:च्या मर्जीतील लोकांना स्थान दिले. तर प्रशासनात होयबा अधिकारी आणि नोकरशाहाच आपल्या सभोवताली राहतील, याची त्यांनी काळजी घेतली. त्यामुळे आताच्या परिस्थितीलाही मोदींचे नेतृत्त्वच जबाबदारी आहे, अशी टीका रामचंद्र गुहा यांनी केली.

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत असं काय घडलं, ज्यामुळे केजरीवालांना मोदींची माफी मागावी लागली?

भाजपा का बाबा बंगाली!, चुटकी बजातेही लशीकरण-वशीकरण, जटिल समस्याका थाली बजाके इलाज; राष्ट्रवादीने डिवचले

उद्धव ठाकरेंनी ऑक्सिजन एअरलिफ्टिंग संकल्पना मांडली, ‘या’ राज्यानं थेट करुन दाखवलं

(PM Narendra Modi Leadership Main Reason for COVID Mishandling says Ramchandra Guha)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.