कोरोनाने आपण जवळची माणसं गमावली, डॉक्टरांसोबत बोलताना पंतप्रधान मोदींना हुंदका दाटला

कोरोनांशी दोन हात करताना आपण या लढाईत अनेक आप्तस्वकीयांना गमावलं, असं मोदी म्हणाले. डॉक्टरांसोबत बोलताना मोदींचा हुंदका दाटला.

कोरोनाने आपण जवळची माणसं गमावली, डॉक्टरांसोबत बोलताना पंतप्रधान मोदींना हुंदका दाटला
PM Narendra Modi emotional
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 2:58 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आपला लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील डॉक्टरांशी संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधलेल्या या संवादादरम्यान मोदींना भावना अनावर झाल्या. कोरोनाने झालेल्या मृत्यूंमुळे मोदी भावूक झाले. कोरोनांशी दोन हात करताना आपण या लढाईत अनेक आप्तस्वकीयांना गमावलं, असं मोदी म्हणाले. डॉक्टरांसोबत बोलताना मोदींचा हुंदका दाटला. (PM NarendraModi gets emotional while talking with doctors from Varanasi he spoke about those who had lost their lives to Covid19)

यावेळी मोदी म्हणाले, “मी काशीचा सेवक या नात्याने सर्व काशीवासियांचे आभार मानतो. विशेष करुन आमचे डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचारी यांनी जे काम केलंय, ते अतुलनीय आहे. या व्हायरसने आपल्या जवळच्या व्यक्तींना आपल्यापासून हिरावलं. मी त्या सर्वांना श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूती व्यक्त करतो”

पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक

कोरोनाची दुसरी लाट घातक 

कोरोनाची दुसरी लाट उसळली आहे. आपल्याला एक होऊन या लाटेचा सामना करावा लागेल. यावेळचा संसर्गदरही अनेक पटीने जास्त आहे. रुग्णांना अनेक दिवस रुग्णालयातच काढावा लागत आहे. त्यामुळे आपल्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे, असंही मोदींनी नमूद केलं.

वाराणसीच्या डॉक्टरांना मोदी म्हणाले, “आपण कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झालो, पण आपल्याला आता वाराणसी आणि पूर्वांचलमधील गावांवर लक्ष केंद्रीत करावं लागेल. आता आपल्याला “जहाँ बीमार, वही उपचार” या मंत्राने काम करावं लागेल”

लसीकरणाचं आवाहन

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपण लसीच्या सुरक्षेकडेही लक्ष दिलं आहे. लसीच्या संरक्षणामुळे फ्रंटलाईन वर्कर्स सुरक्षित आहेत. हेच सुरक्षाकवच आपल्याला प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवायचं आहे. आपला नंबर आल्यानंतर प्रत्येकाने लस टोचून घ्यावी. लस ही प्रत्येकाची जबाबदारी असून पात्र असणाऱ्या प्रत्येकाने लस घ्यावी असं आवाहन मोदींनी केलं.

VIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक 

संबंधित बातम्या 

उद्धव ठाकरेंचे पाय जमिनीवर आले, आनंद आहे : चंद्रकांत पाटील

पंतप्रधान मोदींकडून 11 राज्यातील 60 जिल्हाधिकाऱ्यांसमोर अहमदनगरची दखल, वाचा हिवरेबाजारच्या कोरोनामुक्तीची यशोगाथा काय? 

(PM NarendraModi gets emotional while talking with doctors from Varanasi he spoke about those who had lost their lives to Covid19)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.