PM Modi Meeting | देशातील कोरोनास्थिती गंभीर, पंतप्रधान मोदींच्या मॅरेथॉन बैठका, चार तासात तीन बैठकांचे आयोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालचा दौरा रद्द केल्यानंतर या बैठका आयोजित केल्या आहेत. (PM Narendra Modi high-level Meetings Update)
नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (23 एप्रिल) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मॅरेथॉन बैठका आयोजित केल्या आहेत. यात देशातील सध्याची कोरोना स्थिती, कोरोना रुग्णांचा वाढता आकडा, वाढता मृत्यूदर यावर चर्चा केली जाणार आहे. तसेच कोरोना रोखण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करायला हव्यात, यावरही आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालचा दौरा रद्द केल्यानंतर या बैठका आयोजित केल्या आहेत. (PM Narendra Modi high-level Meetings Today on Corona Pandemic)
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मॅरेथॉन बैठका
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन मॅरेथॉन बैठका घेणार आहेत. यातील पहिली बैठक सकाळी 9 वाजता होणार आहे. तर दुसरी बैठक ही सकाळी 10 वाजता आणि तिसरी बैठक दुपारी 12.30 वाजता घेतली जाणार आहे. या तिन्ही बैठकीत देशातील कोरोना रुग्णांचा आकडा, राज्यातील कोरोनाची परिस्थिती, आरोग्य यंत्रणेवर आलेला ताण, कोरोना रोखण्यासाठीचे निर्बंध यावर चर्चा होणार आहे.
पंतप्रधान मोदी सकाळी 9 वाजताच्या बैठकीत देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहे. तर सकाळी 10 वाजता विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. यात ते राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि आरोग्य यंत्रणेवर आलेला ताण यावर चर्चा करतील. तर दुपारी 12.30 वाजता देशातील आघाडीच्या ऑक्सिजन निर्मिती कंपन्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होईल.
Tomorrow, will be chairing high-level meetings to review the prevailing COVID-19 situation. Due to that, I would not be going to West Bengal.
— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2021
ऑक्सिजनच्या कमतरतेवर चर्चा
गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाविरुद्ध लढाईच्या रणनितींवर राज्यातील प्रमुखांची चर्चा करत आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी विविध डॉक्टर, औषध विक्रेत्या कंपन्या, ऑक्सिजन उत्पादक तसेच इतर बऱ्याच जणांच्या भेटी घेत आहेत. याआधी त्यांनी दिल्लीसह अनेक राज्यात ऑक्सिजनच्या कमतरतेबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती.
यावेळी त्यांनी ऑक्सिजनची निर्मिती आणि पुरवठा करण्याचा वेग वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या. सर्व राज्यांना कोणत्याही अडचणींशिवाय ऑक्सिजनचा पुरवठा करावा. तसेच जे कोणीही ऑक्सिजनचा साठा करत असेल त्यावर तात्काळ कारवाई करावी, असेही मोदी म्हणाले होते. तसेच यावेळी पंतप्रधानांनी ऑक्सिजनची उपलब्धता वाढविण्याच्या पर्यायांवरही चर्चा केली. (PM Narendra Modi high-level Meetings Today on Corona Pandemic)
संबंधित बातम्या :