भारत हे सांस्कृतिक वैभवामुळे जगाच्या पटलावर; पंतप्रधानांच्या हस्ते उज्जैनमध्ये ‘महाकाल लोक’चा भव्यदिव्य कार्यक्रम
उज्जैन हे भारताच्या केंद्रस्थानी असल्याने हे केवळ ज्योतिषशास्त्रामध्येच येते असं नाही तर हे भारताच्या आत्म्याचे केंद्र झाले आहे.
उज्जैनः मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) उज्जैन (Ujjain) येथे मंगळवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकाल कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या कार्यक्रमप्रसंगी सर्वप्रथम मंदिरात पूजा केली. नरेंद्र मोदी यांनी महाकालमध्ये मंत्रोच्चारही केले. महाकाल लोक प्रकल्पाचा पहिला टप्पा यात्रेकरूंना जागतिक दर्जाच्या आधुनिक सुविधा देऊन मंदिरात येणाऱ्या भाविकांचा अनुभव संस्मरणीय बनविण्यास मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान म्हणाले की, भारताचे भौगोलिक स्वरूप हे आजपेक्षा वेगळे असले पाहिजे. उज्जैन हे भारताच्या केंद्रस्थानी असल्याने हे केवळ ज्योतिषशास्त्रामध्येच येते असं नाही तर हे भारताचे केंद्र राहिलेले नाही तर ते भारताच्या आत्म्याचे केंद्र झाले असल्याचे गौरवोदगारही त्यांनी काढले.
जेव्हा एखाद्या राष्ट्राचे सांस्कृतिक वैभव जगाच्या पटलावर त्याचा झेंडा फडकविते तेव्हा त्याचे सांस्कृतिक वैभव हे नेहमीच मोठे असते.
यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी राष्ट्राकडून आपल्या सांस्कृतिक उंचीला स्पर्श करून आपली ओळख अभिमानाने उभी करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
‘महाकाल लोक’चे उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित केले. ते त्यावेळी म्हणाले की, शंकराच्या सहवासात काहीही सामान्य नाही.
सगळ्या गोष्टी या अलौकिक आहेत. महाकालाची शक्ती इतकी आहे की, त्यामुळे काळाच्या रेषाही पुसल्या जातात.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने नरेंद्र मोदींनी संध्याकाळी 6 वाजता पारंपरिक धोतर आणि गमचा परिधान करून मंदिरामध्ये प्रवेश केला.
आणि त्यानंतर त्यांच्या हस्ते महाकालची पूजा करण्यात आली. मोदींसोबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधियाही उपस्थित होते.