PM Modi | आम्ही मान झुकवून-हात जोडून प्रत्येक मुद्यावर चर्चेसाठी तयार आहोत : पंतप्रधान नरेंद्र मोदी
LIVE NEWS & UPDATES
-
आम्ही मान झुकवून-हात जोडून प्रत्येक मुद्यावर चर्चा करण्यासाठी तयार आहोत : पंतप्रधान
अद्यापही काही शंका असेल तर आम्ही मान झुकवून-हात जोडून प्रत्येक मुद्यावर चर्चा करण्यासाठी तयार आहोत, देशातील शेतकरी आणि शेतकऱ्यांचे हित आमच्यासाठी सर्वोच्च आहे, पुन्हा एकदा 25 डिसेंबर रोजी मी देशातील शेतकऱ्यांशी चर्चा करेन
-
आमच्या सरकारने दरवर्षी 75 हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं : पंतप्रधान
काँग्रेसने गेल्या दहा वर्षात फक्त एकदा 50 हजार कोटीच्या कर्ज माफीची घोषणा केली, पण आमच्या सरकारने किसान सन्मान योजनेअंतर्गत दरवर्षी 75 हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं
-
-
काँग्रेसने जेवढं आश्वासन दिलं तितकं कर्ज कधीही माफ केलं नाही : पंतप्रधान
काँग्रेस जेवढं आश्वासन देते तितकं कर्ज माफ करत नाही, याचा फायदा काँग्रेसच्या जवळच्या आणि नातेवाईकांना मिळतो, हे फक्त मोठ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत होते आणि त्यांना असं वाटायचं की त्यांचं काम संपलं
-
शेतकऱ्यांना भ्रमित करु नका, काँग्रेसवर मोदींचा हल्लाबोल
मला क्रेडिट देऊ नको, तुमच्या जुन्या घोषणापत्रांना द्या, मला शेतकऱ्यांचा फायदा हवा आहे, तुम्ही (काँग्रेस) शेतकऱ्यांना भ्रमित करु नका, हा कायदा लागू होऊन सहा महिन्यांपेक्षा जास्तचा कालावधी झाला आहे, पण अचानक विरोधक असे मुद्दे उचलत आहेत, शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवली जात आहे
-
काँग्रेसने केलेली कर्जमाफी हा सर्वात मोठा धोका आहे : पंतप्रधान
आम्ही शेतकऱ्यांना दीडपट जास्त MSP दिला, काँग्रेसने केलेली कर्जमाफी हा सर्वात मोठा धोका आहे, मध्य प्रदेशातील निवडणुकीवेळी 10 दिवसात कर्ज माफ करण्याचं आश्वासन दिलं पण केलं नाही, राजस्थानातही तेच झालं
-
-
जे आज अश्रू गाळत आहेत, त्यांनीच आठ वर्षांपर्यंत स्वामीनाथन रिपोर्टला दाबून ठेवलं होतं : मोदी
ज्यांची राजकीय जमीन गेली, ते आज शेतकऱ्यांना घाबरवत आहेत की त्यांची जमीन जाईल, जे आज अश्रू गाळत आहेत, त्यांनीच आठ वर्षांपर्यंत स्वामीनाथन रिपोर्टला दाबून ठेवलं होतं, यांनी शेतकऱ्यांवर खर्च नाही केला,
-
जे काम 25 वर्षांपूर्वी व्हायला हवं होतं ते आज करावं लागत आहे, पंतप्रधानांचा विरोधकांवर घणाघात
जे काम 25 वर्षांपूर्वी व्हायला हवं होतं ते आज करावं लागत आहे, आम्ही शेतकऱ्यांच्या त्या मागण्या पूर्ण केल्या आहेत ज्या गेल्या अनेक वर्षांपासून रोखण्यात आल्या होत्या. शेतकऱ्यांसाठी जो कायदा तयार करण्यात आला आहे तो रात्रभरात तयार झालेला नाही, गेल्या दशकापासून केंद्र, राज्य सरकार आणि उइतर संस्था यावर चर्चा करत आहेत
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना संबोधन
मध्य प्रदेश में किसान सम्मेलन को संबोधित करते हुए… https://t.co/Rli3e8o9xF
— Narendra Modi (@narendramodi) December 18, 2020
Published On - Dec 18,2020 3:03 PM