गुजरात दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आईची भेट घेतली. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत त्यांनी अर्धा तास आईची भेट घेतली. शनिवारी संध्याकाळी त्यांनी अर्धा तास आपल्या आईची भेट घेतली. साबरमती नदीवरुन अटल पुलाचं (Atal Bridge) उद्घाटन आणि खादी महोत्सवच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर ते आई हिराबेन मोदी (Hiraben Modi) यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाके बंधून पंकज मोदी यांनी याबाबतची माहिती दिली. संध्याकाळी उशिरा नरेंद्र मोदी यांनी आईची अर्ध्या तासासाठी भेट घेतली. त्यानंतर ते पुन्हा राजभवनाकडे रवाना झाले होते. राजभवनावरच त्यांनी रात्रभर विश्रांती करत मुक्काम केला होता. नरेंद्र मोदी हे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस गुजरात दौऱ्यावर आहे. आज त्यांच्या गुजरा दौऱ्याच्या दुसरा आणि अखेरचा दिवस आहे.
Leaving for Bhuj. Sharing highlights from yesterday’s Khadi Utsav and a visit to the iconic Atal Bridge. pic.twitter.com/vViqrSfokM
हे सुद्धा वाचा— Narendra Modi (@narendramodi) August 28, 2022
गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या आणि अखेरच्या दिवशी नरेंद्र मोदी हे कच्छ आणि गांधीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. त्याआधी शनिवारी त्यांनी साबरमती नदीवरील अटर ब्रिज या फूट ओव्हर ब्रिजचचं उद्घाटन केलं. संध्याकाळी त्यांनी खादी महोत्सावाच्याच कार्यक्रमालाही हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केलं. अटल पूल हा साबरमती नदीच्या गोन काठांना जोडणारा तर आहेत, पण तो डिझाईन आणि अद्ययावत असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.
In Kutch tomorrow, I will inaugurate Smriti Van Memorial. This Memorial is associated with the tragic Earthquake of 2001 in which several people lost their lives. Smriti Van is a tribute to those we lost and also a tribute to the remarkable fighting spirit of the people of Kutch. pic.twitter.com/lQFP6oSzA4
— Narendra Modi (@narendramodi) August 27, 2022
खादी हे टिकावू कपड्यांचं एक उत्तम उदाहरण आहे, असंही त्यांनी म्हटलंय. खादी पर्यावरणपूरक आहे. खादीदत सर्वात कमी कार्बन फूटप्रिंट असून अनेक देशातून येत्या दिवसात खादीची मागणी वााढी शकते. त्यामुळे खादी जागतिक स्तरावर मोलाची भूमिका बजावू शकते, असंही मोदींनी यावेळी म्हटलंय. गेल्या 8 वर्षांत खादीच्या विक्रीमध्ये 4 पट वाढ झाली असल्याचंही ते म्हणाले.