पंतप्रधानांच्या भेटीने लष्करी अधिकारी झाला आहे भावूक; या ग्रेट भेटीने सैनिकांचाही ऊर आला भरुन…
लष्करी अधिकारी मेजर अमित ज्यावेळी गुजरातमधील बालाचडीतील सैनिक स्कूलमध्ये शिकत होता, त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींची त्यांनी भेट घेतली होती.
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी सोमवारी कारगिलमधील सशस्त्र दलातील (armed forces) सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. कारगिलमधील लष्करातील अधिकारी जेव्हा पंतप्रधानांची भेट घेत होते, त्यावेळी एका युवा सैन्य अधिकाऱ्याने त्याच्या आयुष्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतची एक आठवण त्यांना सांगितली. नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातच मुख्यमंत्री होते, त्यावेळी या लष्करी अधिकाऱ्याने मोदींची भेट घेतली होती.
त्या भेटीचा फोटोही त्यांनी नरेंद्र मोदींना दिल्यावर सैनिकही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीही भावूक झाले होते. लष्करी अधिकाऱ्यांनी या भेटीची आठवण सांगितली.
त्यावेळी हा सैनिक सैनिक स्कूलमध्ये शिकत होता. त्यावेळची त्यांनी पंतप्रधानांना आठवण सांगितल्यावर त्यांनीही त्या गोष्टीला दाद दिली.
लष्करी अधिकारी मेजर अमित ज्यावेळी गुजरातमधील बालाचडीतील सैनिक स्कूलमध्ये शिकत होता, त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींची त्यांनी भेट घेतली होती.
नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळी त्यांनी कार्यभार स्वीकारला होता. त्यावेळी काही दिवसांनी त्यांनी बालाचडीतील सैनिक स्कुलला भेट दिली होती.
लष्करी अधिकारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ज्यावेळी भेट झाली त्यावेळी मेजर अमितनी त्यांच्या भेटीची ही आठवण सांगितल्या वर मात्र दोघही भावूक झाले होते.
मेजर अमित यांनी ज्यावेळी सैनिक स्कूलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बक्षीस स्वीकारले होते. त्यावेळेचा फोटो त्यांनी नरेंद्र मोदींना भेट दिला.
त्यामध्ये मेजर अमित यांच्यासोबत त्यांचा एक मित्रही असल्याचे दिसत आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदी ज्यावेळी पंतप्रधान झाले होते.
त्यावेळेपासून दरवर्षी सशस्त्र दलाबरोबर दिवाळी साजरी करण्याची परंपरा चालू झाली होती. त्यामुळे आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळी कारगिलमध्ये लष्कराबरोबर दिवाळी साजरी केली, त्यावेळी अनेक गोष्टींनी त्यांनी उजाळा दिला.