नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईने कोरोनाची लस घेतली. पंतप्रधान मोदींनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबेन यांनी कोरोनाची लस घेतली आहे. देशभरात गेल्या 1 मार्चपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरण सुरु आहे. (PM Narendra Modi Mother COVID-19 vaccine)
पात्र व्यक्तींना लस घेण्यासाठी प्रोत्साहन द्या, मोदींचे आवाहन
“मला सांगण्यास प्रचंड आनंद होत आहे की, आज माझ्या आईने COVID-19 कोरोना लसीचा पहिला डोस घेतला, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तसेच कोरोना लसीसाठी पात्र असलेल्या आपल्या आजूबाजूच्या लोकांना मदत करा. त्यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन द्या, असे आवाहन मोदींनी केले.
Happy to share that my mother has taken the first dose of the COVID-19 vaccine today. I urge everyone to help and motivate people around you who are eligible to take the vaccine.
— Narendra Modi (@narendramodi) March 11, 2021
दरम्यान याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मार्चला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोनाची लस घेतली होती. पंतप्रधान मोदी यांनी भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ (Covaxine ) या स्वदेशी लशीला प्राधान्य दिले.
‘कोव्हॅक्सिन’ ही लस हैदराबादस्थित भारत बायोटेक या कंपनीने विकसित केली आहे. जगातील आघाडीच्या कंपन्यांनी कोरोना लस आणल्यानंतर काही दिवसांतच कोव्हॅक्सिन लस बाजारपेठेत आल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतानेही आपण लस विकसित करण्यास समर्थ असल्याचे दाखवून दिले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (11 मार्च) कोरोनाची लस घेतली. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात त्यांनी कोवँक्सिन या लसीचा पहिला डोस घेतला. देशभरात गेल्या 1 मार्चपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी कोरोना लस घेतली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींनी कोरोनाची लस घेतली. यांनीही जे. जे. रुग्णालयात लस घेतली. तसेच, उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनीही यावेळी कोरोनाची लस घेतली. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात ज्येष्ठ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत कोरोना लस घेतली.
तसेच 1 मार्चला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील कोरोना लसीकरणे केले होते. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांना सिरमची कोव्हिशिल्ड लस टोचण्यात आली होती. शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले होते. (PM Narendra Modi Mother COVID-19 vaccine)
संबंधित बातम्या :
देशी की परदेशी,पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेमकी कोणती लस घेतली?
CM Uddhav Thackeray Covid19 Vaccination | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेतली कोरोनाची लस