अविश्वसनीय, मोदींच्या सख्ख्या पुतणीला भाजपनं तिकीट नाकारलं, प्रदेशाध्यक्ष म्हणतात, सर्वांसाठी नियम सारखा !

नरेंद्र मोदींची पुतणी सोनल मोदी यांनी अहमदाबादच्या बोदकदेव वॉर्डातून भाजपाकडे तिकीट मागितलं होतं. (PM Narendra Modi Niece denied ticket)

अविश्वसनीय, मोदींच्या सख्ख्या पुतणीला भाजपनं तिकीट नाकारलं, प्रदेशाध्यक्ष म्हणतात, सर्वांसाठी नियम सारखा !
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 8:42 AM

नवी दिल्ली : ज्या मुलीचा चुलता हा देशाचा पंतप्रधान असेल, पक्षातला सर्वात पॉवरफुल व्यक्ती असेल तिलाच महानगरपालिका निवडणुकीचं तिकीट नाकारलं जाऊ शकतं? ज्या काळात स्वत:च्या घरात मंत्रीपद, तीन तीन आमदार अशी स्थिती आहे त्या काळात हे घडलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची पुतणी सोनल मोदी (Sonal Modi) यांना भाजपाने अहमदाबाद महानगरपालिकेचं तिकीट नाकारलं आहे. (PM Narendra Modi Niece Sonal Modi denied ticket from Gujarat Local Body Election in Ahmedabad)

का नाकारलं गेलं सोनल मोदींना तिकीट?

नरेंद्र मोदींची पुतणी सोनल मोदी यांनी अहमदाबादच्या बोदकदेव वॉर्डातून भाजपाकडे तिकीट मागितलं होतं. काल भाजपाकडून उमेदवारांची घोषणा केली गेली. पण त्यात सोनल मोदी यांचं नाव कुठल्याच वॉर्डातून घोषित केलं गेलेलं नाही. याबाबत भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांना विचारलं असता, सर्वांसाठी नियम सारखे आहेत. आणि नेत्यांच्या नातलगांना तिकीट द्यायचं नाही असा पक्षाचा निर्णय झाल्याचं म्हणाले. त्यानुसारच मोदींच्या पुतणीला तिकीट नाकारलं गेल्याचं कळतंय.

सोनल मोदी काय म्हणाल्या? नेमकं मोदींशी नातं काय?

तिकीट नाकारल्यानंतर सोनल मोदी यांची प्रतिक्रिया बोलकी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुतणी म्हणून नाही तर भाजपाची एक कार्यकर्ती म्हणून तिकीट मागितलं होतं असं सोनल म्हणाल्या. सोनल मोदी ह्या मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी यांची कन्या आहे. प्रल्हाद मोदी यांचं किराणा मालाचं दुकान आहे आणि त्या संघटनेचे ते अध्यक्षही आहेत. सोनल मोदी ह्या भाजपात काही काळापासून काम करतात. (PM Narendra Modi Niece Sonal Modi denied ticket from Gujarat Local Body Election in Ahmedabad)

गुजरातमध्ये महापालिका निवडणुकीचा डंका

गुजरातमध्ये 6 महापालिकांसाठी निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यात अहमदाबाद, सुरत, बडोदा, भावनगर, जामनगर अशा मोठ्या महापालिकांचा समावेश आहे. 21 फेब्रुवारीला मतदान टाकलं जाणार. तसेच 81 नगरपालिका, 31 झेडपी आणि 231 पंचायत समितींसाठी 28 फेब्रुवारीला मतदान होत आहे.

संबंधित बातम्या :

मोदींच्या पुतणीला भाजप तिकीट देणार का? अहमदाबादमधून निवडणूक लढवण्याची इच्छा!

(PM Narendra Modi Niece Sonal Modi denied ticket from Gujarat Local Body Election in Ahmedabad)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.