PM Narendra Modi : पंतप्रधान ॲक्शन मोडवर; राज्यातील या घटनेवरुन मॅरेथॉन बैठक, 5 तासांपर्यंत मंत्र्यांसोबत मंथन, काय आहे अपडेट
Cabinet Meeting Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत बुधवारी मॅरेथॉन बैठक घेतली. ही बैठक 5 तास चालली. महिला, गरीब, तरुण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आणि विकासावर या बैठकीत चर्चा झाली. ज्या सरकारी मंत्रालयाचे काम संथगतीने सुरु आहे. त्यांना पंतप्रधान मोदींनी टास्क दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मंत्रिपरिषदेची बैठक घेतली. त्यात महाराष्ट्रासह देशातील काही महत्वाच्या मुद्दावर पण चर्चा झाली आहे. महिला अत्याचार आणि सुरक्षा विषयावर चर्चा झाली. दिल्लीत सुषमा स्वराज भवनात 5 तास बैठक झाली. भाजप नेतृत्वातील एनडीए सरकार तिसऱ्या कार्यकाळात पहिल्या 100 दिवसांच्या कामकाजासाठीची माहिती घेण्यात आली. बैठकीत पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि इतर राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर चर्चा झाली. महिला, गरीब, तरुण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आणि विकासावर या बैठकीत चर्चा झाली. ज्या सरकारी मंत्रालयाचे काम संथगतीने सुरु आहे. त्यांना पंतप्रधान मोदींनी टास्क दिला आहे.
100 दिवसांच्या अजेंड्यावर चर्चा
कॅबिनेटच्या बैठकीत मिशन 2047 वर विशेष जोर देण्यात आला. बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा विकास आणि मोठ्या भरारीसाठी तयार राहण्यास सांगितले. केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा 100 दिवसांतील आढावा घेण्यात आला. या योजना जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी प्रचार आणि प्रसारासाठी काय केले त्याची समीक्षा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे संथगतीने कामकाज करत आहेत, त्या महत्वपूर्ण मंत्रणालयांना पुढील 6 महिन्यांचे टास्क दिले आहे. बैठकीत इन्फ्रा, सोशल, डिजिटल आणि तंत्रज्ञान विषयाशी संबंधित मंत्रालयाने सादरीकरण केले.
कामामुळे जनतेने निवडून दिले
गेल्या दहा वर्षात केलेल्या कामकाजामुळे जनतेने निवडून दिले आहेत. पुढील पाच वर्षांपर्यंत सातत्याने विकास करायचा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. इंफ्रास्ट्रक्चर, आरोग्य आणि शिक्षण योजनांवरील पीपीटी आणि महत्वपूर्ण निर्णयावर चर्चा झाली. तर आईसाठी एक वृक्ष हे अभियान आणि स्वच्छता अभियानावर चर्चा झाली.
2047 पर्यंत विकसीत भारताचे स्वप्न
पायाभूत सुविधा देण्यावर केंद्र सरकार भर देत आहे. एनडीए सरकारने 2047 पर्यंत विकसीत भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवीन रेल्वे मार्ग, बंदर विकास विमानतळ आणि औद्योगिक स्मार्ट शहरांची निर्मितीवर भर देण्यात येत आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे संथगतीने कामकाज करत आहेत, त्या महत्वपूर्ण मंत्रणालयांना पुढील 6 महिन्यांचे टास्क दिले आहे. बैठकीत इन्फ्रा, सोशल, डिजिटल आणि तंत्रज्ञान विषयाशी संबंधित मंत्रालयाने सादरीकरण केले.