PM Modi Speech : मोदी है मौका लिजिए, पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मुद्दे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत भाषण करताना देशात आंदोलनाच्या नावाखाली गोंधळ घालणाऱ्यांवर जोरदार टीका केली.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत भाषण केलं. नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाबद्दल आभार व्यक्त केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनावरुन सभागृहात भाष्य केलं. कृषी कायद्याबाबत सभागृहात सविस्तर चर्चा का केली नाही? असा सवाल मोदींनी विरोधकांना विचारला. यावेळी पंतप्रधांनांनी देशभरातील विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाषणात बंगालचा उल्लेख
बंगालच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मोदींनी त्यांच्या भाषणात बंगालचा उल्लेख केला. तसेच तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला. तसेच यावेळी त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आठवण काढली. भारताचा राष्ट्रवाद हा सत्यम, शिवम, सुंदरम, हे नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी म्हटलं होतं, याची आठवण मोदींनी यावेळी करुन दिली. मोदी म्हणाले की, आपण नेताजींच्या आदर्शांना विसरलो आहोत.
कवी मैथिलीशरण गुप्त यांची कविता मोदींकडून संसदेत सादर
अवसर तेरे लिए खडा है, फिर भी तू चुपचाप पडा है, तेरा कर्मक्षेत्र बडा है, पलपल है अनमोल, अरे भारत उठ, आँखे खोल, अवसर तेरे लिए खडा है, तू आत्मविश्वास से भरा पडा है, हर बाधा, हर बंदीश को तोड, अरे भारत आत्मनिर्भरता के पथपर दौड ही कविता सादर असताना पंतप्रधान मोदींनी 21 व्या शतकातील, वर्तमान काळातील परिस्थितीवरुन कवितेचं वर्णन केलं. भारतासाठी अनेक संधी चालून आल्या आहेत. जो देश तरुण आहे, तो देश अशा संधी जाऊ नाही देणार. आपण स्वातंत्र्यांची 75 वर्षे पूर्ण करतोय, हे प्रेरणेचं पर्व व्हावं, देशाच्या शतकोत्सवाचा विचार करायला हवा, जगाला वाटतं की, हे भारत करु शकला तर जगाच्या समस्या सुटतील, असं मोदी म्हणाले.
ज्यांना थर्ड वर्ल्ड कंट्री म्हणून हिणवलं जात होतं, ते आता लस घेऊन आलेत : मोदी
ज्यांना थर्ड वर्ल्ड कंट्री म्हणून हिणवलं जात होतं, ते आता वॅक्सिन (कोरोनावरील लस) घेऊन आले आहेत. सोबतच जगातील सर्वात मोठं लसीकरण आपल्या देशात होतंय, भारताचं हे सामर्थ्य जगभरात सर्वत्र पोहोचलं आहे.
शेतीवरील समस्येवर उपाय शोधायची वेळ
पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींच्या काळात कोणीही कृषी मंत्री व्हायला तयार नव्हते, सी. सुब्रमण्यम यांना शेवटी शास्त्रींनी कृषी मंत्री केलं. डावे त्यावेळेसही म्हणत होते, हे अमेरिकेचे एजंट आहेत, तरीही शास्त्रींनी सुधारणा राबवल्या, शेतीत समस्या आहेत, हे मान्य करावंच लागेल, पण आता त्यावर उपाय शोधायची वेळ असल्याचे मोदींनी यावेळी नमूद केले.
शरद पवार सुधारणांच्या बाजूनं, राजकारणासाठी काहींचा यू टर्न : मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमचे आदरणीय शरद पवार यांनी कृषी कायद्यातील सुधारणांवर भाष्य केलं, शरद पवारांनी सांगितलं, आम्ही सुधारणांच्या बाजूने आहोत, परंतु आता अचानक राजकारणासाठी यू टर्न घेतला. त्यासाठी स्वत:चे विचारही सोडले.
तुम्हाला गर्व वाटायला हवा, मनमोहन सिंह यांनी सांगतलं ते मी करतोय : मोदी
मोदी म्हणाले की, “माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची तरी गोष्ट लक्ष ठेवा, माझी कुठलीही गोष्ट लक्षात नाही ठेवली तरी चालेल, परंतु तुम्हाला (विरोधकांना) गर्व वाटायला हवा, मनमोहन सिंह यांनी जे म्हटलं होतं ते मोदी करत आहेत.” मोदी म्हणाले की, “their are other rigidities because of the whole markets regime setup in the 1930’s which prevent our farmers from selling their produce where they get the higher rate of return. it is our intension to remove all those handicaps which come in the way of India, realizing its wast potential, at one large common market”, हे आदरणीय मनमोहन सिंहानी सांगितलं होतं, तेच काम आम्ही करतोय, तुम्हाला गर्व वाटायला हवा, मनमोहनसिंग यांनी जे म्हटलं ते मोदी करतायत
संकटकाळातही 150 देशांना भारताने औषध पुरवलं
जेव्हा कोरोना काळात अनेक देशांमध्ये विविध प्रकारची औषधं नव्हती, तेव्हा जगाचं लक्ष भारताकडे होतं. त्या संकटकाळातही 150 देशांना भारताने औषध पुरवलं. भारतातने अनेक देशांना कोरोनावरील लसही पुरवली आहे. जग आज मोठ्या अभिमानाने सांगतं की, आमच्याकडे भारताची लस आली आहे.
संघराज्य पद्धती या कोरोना काळात मजबूत झाली
केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून चांगलं काम केलं, राज्यांना मी विशेष धन्यवाद देतो. संघराज्य पद्धती या कोरोना काळात मजबूत झाली. लोकशाहीवरून खूप उपदेश दिले गेले, भारताची लोकशाही अशी नाही की जिची सालपटं काढली जातील.
काँग्रेसने देशाची निराशा केली, आता तृणमूलही त्यांच्याच पंगतीत
लोकशाहीवरून आपल्याला खूप उपदेश दिले गेले, भारताची लोकशाही अशी नाही की जिची सालपटं काढली जातील, तृणमूल खासदार डेरेक ओ ब्रायन मोठमोठे शब्द वापरत होते, कळतंच नव्हतं ते देशाबद्दल बोलतायत की बंगालबद्दल. असे म्हणत मोदींनी ममता बॅनर्जींना अप्रत्यक्ष टोला लागावला. मोदी म्हणाले की, काँग्रेस देशाला निराश करते, त्यांच्या (तृणमूल) सदस्यांनीही तसंच केलं, असं मोदी म्हणाले.
आपली लोकशाही ही वेस्टर्न नव्हे तर मानवी : मोदी
आपली लोकशाही कुठल्याही प्रकारे वेस्टर्न नाही तर मानवी आहे. भारताचा इतिहास लोकशाहीच्या उदाहरणांनी भरलेला आहे, आज देशवासियांना भारताच्या राष्ट्रवादावर होणाऱ्या हल्ल्यापासून सूचित करणे गरजेचं आहे, भारताचा राष्ट्रवाद हा स्वार्थी नाही.
मोदी है तो मौका है
तुमच्या मनात कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे राग असेल, तो माझ्यावर काढला, त्यामुळे तुमचं मन हलकं झालं, माझ्यामुळे तुम्हाला आनंद मिळत असेल, जर मी त्यासाठी कामी आलो तर ते ही माझं सौभाग्य समजतो. याचा आनंद घ्या, चर्चा करा, मोदी आहे मौका (संधी) मिळत असेल तर ती घ्या, असं मोदी यावेळी म्हणाले.
दिशाभूल करणाऱ्या परदेशींपासून सावध राहा
देशात एक नवा एफडीआय, फॉरेन डिस्ट्रक्विव्ही आयडॉलॉजी फाफोवतेय, देशानं यांच्यापासून स्वत:ला वाचवायला हवं, दिशाभूल करणाऱ्यां परदेशींपासून सावध राहायला हवं, असा इशारा मोदींनी देशवासियांना दिला आहे.
देशात नवी आंदोलनजीवी जमात
गेल्या काही काळापासून ह्या देशात नवी बिरादारी समोर आलीय, ती आहे आंदोलनजीवी, कुठलेही आंदोलन असेल हे तिथं पोहोचतात, वकिलांचं असो, स्टुडंटसचं असो, जिथे आंदोलन असेल तिथं ते पोहोचतात. देशानं या आंदोलनजीवींपासून सावध रहायला हवं, आंदोलनजीवी हे सगळे परजीवी असतात, ज्यांचं ज्यांचं सरकार आहे त्या सगळ्यांना या आंदोलनजीवी, परजीवींचा अनुभव येतो
संबंधित बातम्या
श्रमजीवी, बुद्धिजीवी ऐकले होते, आता आंदोलनजीवी अशी नवी जमात आलीय: मोदी
(PM Narendra Modi parliament speech highlights)