काँग्रसेच्या काळातील रखडलेल्या योजनांचा वाचला पाढा; मोदी गॅरंटी काय हेच उदाहरणासह सांगितले

What India Thinks Today | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या काळात रखडलेल्या योजनांचा पाढाच वाचला. त्यांनी काँग्रेसच्या वेळकाढू धोरणांवर घणाघाती टीका केली. करदात्यांच्या पैशांचा सन्मान झाला तर राष्ट्राचा कसा विकास होऊ शकतो, हे त्यांनी दाखले देत सांगितले. मोदींची गॅरंटी काय हे त्यांनी सांगितले.

काँग्रसेच्या काळातील रखडलेल्या योजनांचा वाचला पाढा; मोदी गॅरंटी काय हेच उदाहरणासह सांगितले
Follow us
| Updated on: Feb 26, 2024 | 11:01 PM

नवी दिल्ली | 26 February 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या वेळाकाढू धोरणावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी गेल्या 40 वर्षांतील रखडलेल्या काही योजनांचे दाखले दिले. करदात्यांच्या पैशांचा सन्मान झाला तर देशाचा विकास कसा होतो, हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. मोदींची गॅरंटी काय हे त्यांनी सांगितले. भारत ज्या वेगाने पुढे जात आहे, ते कल्पनेच्या पलिकडे आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. TV9 च्या वार्षिक संमेलन व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्य भाषणाने उपस्थितींमध्ये जोश भरला.

पंतप्रधानांनी असा वाचला पाढा

  • ‘मी तुम्हाला काही उदाहरणे देतो. उत्तर प्रदेशात ८०च्या दशकात शरयू नहर परियोजनेचा शिलान्यास झाला होता. ही परियोजना चार दशके अटकली होती. २०१४मध्ये ही परियोजना आम्ही वेगाने पूर्ण केली. सरदार सरोवरचा शिलान्यास ६०च्या दशकात पंडित नेहरू यांनी शिलान्यास केला होता. ६० वर्षापर्यंत सरदार सरोवर डॅमचं काम असंच अडकलं होतं. सरकार बनल्यानंतर २०१७मध्ये आम्ही डॅम पूर्ण करून आम्ही लोकापर्ण केलं. महाराष्ट्रातील कृष्णा कोयना परियोजनाही सुद्धा ८० दशकात तयार झाली. ती अशीच लटकली होती. या डॅमचं कामही आमच्याच सरकारने पूर्ण केलं.
  • गेल्या काही दिवसापूर्वी तुम्ही अटल टनेलच्या आसपास बर्फवृष्टी झाल्याचं तुम्ही पाहिलं. अटल टनेलही २००२मध्ये शिलान्यास झाला. २०१४पर्यंत काहीच घडलं नाही. त्याचं कामही आमच्या सरकारने पूर्ण केलं. त्याचं २०२०मध्ये लोकार्पण केलं. आसामचा बोगी बिल ब्रिज बी १९८८ मध्ये स्वीकृत झाला. आम्ही सरकार येताच २० वर्षात तो पूर्ण केला. इस्टंट डेडिकेटेड फ्रेड कॅरिडोरही आम्ही १५ वर्षानंतर पूर्ण केला. मी असे कमीत कमी ५०० प्रकल्प सांगू शकतो. अशा शेकडो प्रकल्प आम्ही हे पूर्ण केले.” पंतप्रधानांनी काँग्रेसच्या काळातील प्रकल्प कसे झटपट पूर्ण झाले याची माहिती दिली.

ही ‘प्रगती’ तरी काय?

हे सुद्धा वाचा

प्रगती नावाने आम्ही एक टेक्नॉलॉजी पंतप्रधान कार्यालयात सुरु केल्याचे त्यांनी सांगितले. मी स्वतः महिन्यातून एकदा सर्व फायली घेऊन बसतो. त्याचं समीक्षण करतो. दशकांपासून अटकलेल्या सर्व फायली बघतो. सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि भारत सरकारचे सचिव समोर असतात. प्रत्येक गोष्टीचं सविस्तर विश्लेषण होतं. गेल्या काही वर्षात मी १७ लाख कोटी प्रकल्पाची समीक्षा केली. तेव्हा हे प्रकल्प पूर्ण झाले. ज्या देशात आधीची सरकार त्या स्पीडने काम करत असेल तर देश मोठी झेप कशी घेणार होता? आमच्या सरकारने लटकावणे आणि भटकावण्याचा दृष्टिकोण मागे टाकल्याचा चिमटा त्यांनी काँग्रेसला काढला.

हीच तर मोदींची गॅरंटी

  • मी आमच्या सरकारची काही उदाहरणे देतो. मुंबईचा अटल सेतू देशातील सर्वात मोठा सी ब्रीज. त्याचा शिलान्यास २०१६मध्ये झाला. त्याचं उद्घाटन केलं. संसदेची नवी इमारत तयार केली. जम्मू एम्स तयार केलं. राजकोट एम ही पूर्ण केलं. त्रिची एअरपोर्टचंही लोकार्पण झालं. आयआयटी भिलाईचा शिलान्यास झाला आणि लोकार्पण केलं. गोव्याच्या नव्या विमानतळाचं लोकार्पण केलं. लक्षद्वीपमध्ये ऑप्टिकल फायबर बसवले. हे काम कठिण होतं. काही आठवड्यापूर्वीच आम्ही पूर्ण केलं.
  • कालच द्वारकेत सुदर्शन सेतूची फोटो पाहिले. देशाचं हा ब्रीज आम्ही शिलान्यास केला. तो पूर्ण केला. मी मोदी गॅरंटी म्हणतो ना ती हीच आहे. ही स्पीड जेव्हा असते, वेगाने काम करण्याची इच्छा असते आणि टॅक्सपेअरच्या पैशाचा सन्मान असतो, तेव्हा देश मोठी झेप घ्यायला तयार असतो. भारत ज्या वेगाने पुढे जात आहे, ते कल्पनेच्या पलिकडे असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.