नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात सोमवारी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना कोरोनाची लस देण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ (Covaxine ) या स्वदेशी लशीला प्राधान्य दिले. (PM Narendra Modi Took first dose of the COVID-19 vaccine at AIIMS)
भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसीच्या सुरक्षिततेविषयी अद्याप अनेकांच्या मनात शंका आहे. या लसीच्या मानवी चाचणीचा टप्पा पूर्ण होण्यापूर्वीच केंद्र सरकारकडून आपातकालीन वापरासाठी ‘कोव्हॅक्सिन’च्या वापराला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे अनेकांच्या मनात ‘कोव्हॅक्सिन’चा दर्जा आणि सुरक्षिततेविषयी शंका होत्या. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोव्हॅक्सिन ही देशी लस घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता.
मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोव्हॅक्सिन लच टोचून घेण्याचा कृती निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लसीविषयीची शंका दूर होण्याची शक्यता आहे. परिणामी लसीकरण मोहिमेचा वेगही वाढण्याचा अंदाज आहे. 1 मार्चपासून देशातील ज्येष्ठ व्यक्ती आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांना कोरोनाची लस देण्याचे सरकारने जाहीर केले होते. याशिवाय, खासगी रुग्णालयातही 250 रुपयांत कोरोना लस देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने नुकतीच यासाठी परवानगी दिली.
Took my first dose of the COVID-19 vaccine at AIIMS.
Remarkable how our doctors and scientists have worked in quick time to strengthen the global fight against COVID-19.
I appeal to all those who are eligible to take the vaccine. Together, let us make India COVID-19 free! pic.twitter.com/5z5cvAoMrv
— Narendra Modi (@narendramodi) March 1, 2021
‘कोव्हॅक्सिन’ ही लस हैदराबादस्थित भारत बायोटेक या कंपनीने विकसित केली आहे. जगातील आघाडीच्या कंपन्यांनी कोरोना लस आणल्यानंतर काही दिवसांतच कोव्हॅक्सिन लस बाजारपेठेत आल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतानेही आपण लस विकसित करण्यास समर्थ असल्याचे दाखवून दिले होते.
कोरोनाची लस टोचून घेणं बंधनकारक नाही. ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार कोरोनाची लस घेऊ शकता. कोणावरही लसीसाठी जबरदस्ती नाही. लस घेणं किंवा न घेणं ऐच्छिक असेल.
सध्या सामान्य नागरिकांसाठी लस उपलब्ध नाही. कोव्हिड योद्धे, हायरिस्क कॉन्टॅक्टमधील कर्मचारी, आणि आता ज्येष्ठ नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोव्हिड 19 व्हॅक्सिनसाठी Co-WIN App तयार केलं आहे. हे अॅप प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड केल्यानंतर त्यावर रजिस्ट्रेशन करावं लागेल. सध्या तरी सर्वांना या अॅपचा अॅक्सेस नाही.
संबंधित बातम्या:
भारत बायोटेकची स्वदेशी कोव्हॅक्सिन घेण्यास ‘त्या’ डॉक्टरांचा नकार
कोव्हॅक्सिनसाठी भारत बायोटेकची गुंतवणूक किती? जाणून घ्या सर्व माहिती
लढ्याला यश! भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता
(PM Narendra Modi Took first dose of the COVID-19 vaccine at AIIMS)